शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

वेंगुर्ले पोलिसांनी पाठलाग करून पकडली दारुची गाडी, पावणे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 16:57 IST

मळेवाड-सावंतवाडी रस्त्यावर पोलिसांची नाकाबंदी पाहून आरोंद्याच्या दिशेने पळ काढणाऱ्या कारचालकाचा वेंगुर्ले पोलीस पथकाने पाठलाग केला. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या थरारात मातोंड-सातवायंगणी येथे कार टाकून चालक पसार झाला. या कारवाईत वेंगुर्ले पोलिसांनी सुमारे १ लाख ८४ हजार ३२० रुपयांच्या दारूसह कार ताब्यात घेतली. वेंगुर्ले पोलिसांनी गेल्या सहा महिन्यांत केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.

ठळक मुद्देमातोंड-सातवायंगणी येथे कार टाकून चालक पसार १ लाख ८४ हजार ३२० रुपयांच्या दारूसह कार ताब्यात, पोलिसांची कारवाई वेंगुर्ले पोलिसांची गेल्या सहा महिन्यांत केली सर्वात मोठी कारवाई

वेंगुर्ले : मळेवाड-सावंतवाडी रस्त्यावर पोलिसांची नाकाबंदी पाहून आरोंद्याच्या दिशेने पळ काढणाऱ्या कारचालकाचा वेंगुर्ले पोलीस पथकाने पाठलाग केला. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या थरारात मातोंड-सातवायंगणी येथे कार टाकून चालक पसार झाला. या कारवाईत वेंगुर्ले पोलिसांनी सुमारे १ लाख ८४ हजार ३२० रुपयांच्या दारूसह कार ताब्यात घेतली. वेंगुर्ले पोलिसांनी गेल्या सहा महिन्यांत केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.वेंगुर्ले पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अभिजित कांबळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, पोलीस कॉन्स्टेबल अमोल धुरी, अजय नाईक, वाहतूक पोलीस दत्तात्रय पाटील या पथकाने रविवारी रात्री मळेवाड-सावंतवाडी रस्त्यावर नाकाबंदी करुन मातोंड-घोडेमुख येथे वाहन तपासणी सुरू केली. रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास सोनेरी रंगाची कार आली. मात्र, पोलिसांची नाकाबंदी पाहून चालकाने लगेच कार वळवून आरोंद्याच्या दिशेने भरधाव सोडली. या कारचा तत्काळ पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या पथकाने पाठलाग केला.

रात्री १ वाजण्याच्या सुमारास मातोंड-सातवायंगणी येथे ही कार दरवाजा उघडा टाकलेल्या स्थितीत आढळली. चालकाने मात्र पलायन केले होते. या कारवाईत सुमारे १ लाख ८४ हजार ३२० रूपये किमतीची गोवा बनावटीची दारू व कारसह एकूण ७ लाख ८४ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी वेंगुर्ले पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गliquor banदारूबंदी