शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

वेंगुर्ले मुख्याधिका-यांची तडकाफडकी बदली, कर्जत नगरपालिकेत हजर होण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 19:50 IST

वेंगुर्ले : स्वच्छ भारत उपक्रमांतर्गत वेंगुर्ले शहराचे नाव देशपातळीवर नेणारे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांची शासनाने गुरुवारी तडकाफडकी बदली केली.

वेंगुर्ले : स्वच्छ भारत उपक्रमांतर्गत वेंगुर्ले शहराचे नाव देशपातळीवर नेणारे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांची शासनाने गुरुवारी तडकाफडकी बदली केली. या अचानक झालेल्या बदलीमुळे वेंगुर्ले परिसरात खळबळ माजली असून, त्यांना तातडीने रायगड जिल्ह्यातील कर्जत नगरपालिकेत हजर होण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.रामदास कोकरे यांनी दोन वर्षांपूर्वी वेंगुर्ले नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला होता. त्यांनी आपल्या काळात अनेक विकासात्मक कामेही केली होती. त्यांनी उघड्यावर शौचास बसणा-यांवर केलेली कारवाई ख-या अर्थाने वादग्रस्त बनली होती. त्यावेळी त्यांच्यावर टीकाही झाली होती. तसेच त्यांच्यावर नगरसेवकांना विकासकामात विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोपही वेळोवेळी केला जात होता. नगरसेवक संदेश निकम यांनीही मध्यंतरी कोकरेंच्या बदलीची जोरदार मागणी केली होती.मुख्याधिकारी कोकरे यांनी आपल्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले शहरात प्लास्टिक बंदी करून प्लास्टिक मुक्त केले. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प योग्य प्रकारे हाताळून येथील डंपिंग ग्राऊंडचा कायापालट केला. झिरो सॉलिड वेस्ट करून डंपिंग ग्राऊंडला स्वच्छ भारत पर्यटनस्थळ असे नाव दिले.स्वच्छ भारत अभियानांतर्गत वेंगुर्ले नगरपरिषदेला महाराष्ट्रात तसेच कोकण विभागात प्रथम क्रमांक मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. याबरोबरच हागणदारीमुक्त शहर, वसुंधरा पुरस्कार, उत्कृष्ट मुख्याधिकारी असे अनेक पुरस्कार त्यांच्या कालावधीत वेंगुर्ले नगरपरिषदेला मिळाले आहेत. गुरुवारी सकाळी नगरविकास खात्याने मुख्याधिकारी कोकरे यांच्या बदलीचे आदेश काढले. यात महाराष्ट्र शासकीय कर्मचा-यांच्या बदल्यांचे अधिनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंधक अधिनियम २००५ मधील कलम ४ (४) व ४ (५) नुसार मुख्याधिकारी रामदास कोकरे यांची बदली करण्यात येत असल्याचे सांगितले.केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत उपक्रमात कोकरे यांनी महत्त्वाचे योगदान देताना वेंगुर्ले शहराचे नाव राज्याबरोबरच देशपातळीवर चमकविले होते. कोकरे यांच्या या कामगिरीची दखल घेताना सिने अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला होता. कोकरे यांच्या बदलीमुळे वेंगुर्ले नगरपरिषदेचा अतिरिक्त कार्यभार कसई-दोडामार्ग नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्याकडे देण्यात आला आहे.अमिताभ बच्चन यांनी केले होते कौतुकमुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी स्वच्छ भारत योजनेत वेंगुर्लेचे नाव देशपातळीवर नेले होते. त्यांचे कौतुकही करण्यात आले होते. तसेच सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनीही कोकरे यांच्या कामाचे कौतुक केले होते. त्यामुळे कोकरे जिल्ह्यात चर्चेत आले होते.मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी अनेक विकासकामात अडसर निर्माण केला आहे. विकासाच्या कोणत्याच योजना पुढे केल्या जात नव्हत्या. तसेच अलिकडेच मच्छीमार्केटचा प्रश्न अगर गटाराचा प्रश्न असो स्थानिकांना विश्वासात न घेता कामे केल्यामुळे सर्वजण त्रस्त होते. आम्ही या विरोधात आवाजही उठविला होता. तसेच कोकरे यांच्या बदलीची मागणी केली होती. त्या मागणी प्रमाणेच शासनाने बदली केली आहे,  असे मत नगरसेवक संदेश निकम यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग