सिंधुदुर्ग - राज्यात नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीचे निकाल आता समोर आले आहेत. त्यात तळ कोकणातील वेंगुर्ला नगरपरिषदेत शिंदेसेनेचे नेते दीपक केसरकर यांना धक्का बसला आहे. वेंगुर्ला नगरपरिषदेत ८ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यात भाजपाचे ७ आणि शिंदेसेनेचा एक उमेदवार विजयी झाली आहे.
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदांसाठी २ डिसेंबरला निवडणूक झाली होती. त्यानंतर आज सकाळी १० वाजल्यापासून वेंगुर्ला तहसील कार्यालयात मतमोजणी सुरू झाली. त्यात सुरुवातीपासून भाजपा उमेदवारांनी आघाडी घेतली होती. आता ८ जागांचे निकाल जाहीर झाले त्यात भाजपाने शिंदेसेनेला धक्का दिला आहे. आरोप-प्रत्यारोप आणि पैसे वाटपावरून गाजलेल्या पालिका निवडणुकीच्या निकालाकडे सर्व जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिले होते. पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार नीलेश राणे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत सत्ताधारी भाजपा आणि शिंदेसेना या दोन पक्षांमध्येच जोरदार टक्कर पहायला मिळाली.
या निवडणुकीत सर्वच पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढविल्या. केवळ मालवणमध्ये उद्धवसेना आणि काँग्रेस एकत्र आली. तर कणकवलीमध्ये भाजपा विरूद्ध सर्व पक्षांची मोटबांधून सर्वपक्षीय शहर विकास आघाडीची स्थापना करण्यात आली होती. जिल्ह्यात मात्र भाजप आणि शिंदेसेना या दोन सत्ताधारी पक्षांमध्येच राजकीय संघर्ष पहायला मिळाला.
Web Summary : BJP secured a major victory in Vengurla Nagar Parishad elections, winning 7 seats. Deepak Kesarkar's Shinde Sena managed only one. The election saw fierce competition, especially between BJP and Shinde Sena, with all parties contesting independently.
Web Summary : वेंगुर्ला नगर परिषद चुनाव में भाजपा ने बड़ी जीत हासिल की, 7 सीटें जीतीं। दीपक केसरकर की शिंदे सेना को केवल एक सीट मिली। चुनाव में कड़ी प्रतिस्पर्धा देखी गई, खासकर भाजपा और शिंदे सेना के बीच, सभी दलों ने स्वतंत्र रूप से चुनाव लड़ा।