शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

Sindhudurg News: हळदी-कुंकवाचे वाण, पर्यावरणाची जाण, केर-भेकुर्ली ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 18:15 IST

महिलांनी हळदी-कुंकवाच्या दिवशी हरितगाव आणि स्वच्छ गाव राखण्याचा केला संकल्प

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील आदर्श उपक्रमासाठी प्रसिद्ध असणाऱ्या केर-भेकुर्ली ग्रामपंचायतीने हळदी-कुंकू कार्यक्रम अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. यावर्षी महिलांनी हळदी-कुंकवाच्या दिवशी हरितगाव आणि स्वच्छ गाव राखण्याचा संकल्प केला.  त्या अनुषंगाने गावातील सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपणही केले. एवढेच नव्हे, तर वृक्ष जगविण्याचे नियोजनही केले. त्यामुळे ‘हळदी-कुंकवाचे वाण,  देईल जन्मभर आठवण’चा संदेशही यानिमित्ताने मिळाला.महिला माता-भगिनी आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने आज हळदी-कुंकू समारंभ उत्तमरीत्या पार पडला. महिलांना वाण दिलेच, शिवाय महिलांनी हळदी-कुंकू वेगळा संदेश देणारा ठरला. महिलांनी वृक्षारोपण करत वाण कायमस्वरूपी स्मरणात राहण्यासाठी सुपारी रोपे चव्हाटा मंदिर परिसरात लावली. शिवाय ‘स्वच्छ गाव, हरित गाव’चा संकल्पही महिलांनी केला. ग्रामपंचायत, आदर्शगाव समिती, संजीवनी बहुउद्देशीय संस्था, वनश्री फाउंडेशनतर्फे कार्यक्रम झाला.

गाव स्वच्छतेत महिलांनी घेतला पुढाकार

  • कार्यक्रमाचे औचित्य साधून संजीवनी संस्थेच्या सौ. दीक्षित यांच्यासह महिला उद्योजकता प्रशिक्षक विनीता देसाई यांनी महिलांना रोजगारविषयक मार्गदर्शन करीत स्वावलंबनाचे धडे दिले.
  • संजीवनी संस्थेने महिलांना हळदी-कुंकू वाण म्हणून सुपारी रोपे दिली.
  • ती महिलांनी केर चव्हाटा मंदिर, ग्रामपंचायत, जि. प. शाळा केर नं. एक, जि. प. शाळा निडली, जि. प. शाळा भेकुर्ली येथे वृक्षारोपण केले. तसेच गाव स्वच्छतेत महिलांनी आपण पुढाकार घेण्याचा संकल्प केला. 
टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गWomenमहिलाenvironmentपर्यावरण