शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
3
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
4
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
5
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
6
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
7
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
8
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
9
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
10
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
11
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
12
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
13
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
14
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
15
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
16
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
17
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
18
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
19
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
20
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: वैभववाडी रेल्वे स्थानक 'अच्छे दिन'च्या प्रतिक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 19:45 IST

समस्यांचे ग्रहण आणि 'कोमेजलेल्या' राजकीय 'इच्छाशक्ती'चा' प्रवाशांना बसतोय फटका

प्रकाश काळे वैभववाडी : वैभववाडी कणकवली, देवगड, गगनबावडा या चार तालुक्यातील प्रवाशांचा आधार असलेल्या वैभववाडी रोड रेल्वे स्थानकाला लागलेले समस्यांचे ग्रहण सुटायला तयार नाही. प्लॅटफॉर्मवर बसायला नीट जागा नाही. ऊन्ह आणि पावसासाठी छप्पर नाही. ५ वर्षे होत आली; तरी आरक्षण खिडकी उघडायला तयार नाही, एकाही जलद गाडीला थांबा नाही. अशा अनेक समस्यांनी वैभववाडी रेल्वे स्थानकाला ग्रासलेले आहे. परंतु, या समस्या सोडविण्यासाठी लागणारी राजकीय इच्छाशक्ती काहीशी कोमेजून गेलेली दिसते. त्यामुळेच सुट्या, सण, उत्सव सोडले तरी दरदिवशी हजारो प्रवाशांची ये-जा होत असलेल्या वैभववाडी रोड रेल्वे स्थानकावर 'अच्छे दिन' कधी येणार? याकडे प्रवाशांचे डोळे लागले आहेत.रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर मध्यवर्ती रेल्वे स्थानक वैभववाडी आहे. त्यामुळे रत्नागिरीतून थेट कुडाळ सावंतवाडीत थांबणाऱ्या काही सुपरफास्ट रेल्वे गाड्यांना वैभववाडीत थांबा मिळावा ही रेल्वे प्रवाशांची खूप वर्षांपासूनची मागणी आहे. परंतु, या मागणीला राजकीय पाठबळ देण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. हे रेल्वे प्रवाशांचे दुर्दैव म्हणावे की प्रवाशांविषयी असलेली अनास्था? हेच समजून येत नाही. रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांसाठी स्व. बंडू मुंडल्येंव्यतिरिक्त आजमितीस कोणीही 'ट्रॅक'वर उतरुन काहीतरी स्थानकाच्या म्हणजे रेल्वे प्रवाशांच्या पदरात पाडून घेताना दिसले नाही.वैभववाडी तालुक्यासह कणकवली तालुक्यातील नांदगाव, तळेरे खारेपाटण पट्टा तसेच देवगड तालुक्यातील शिरगाव पासून विजयदुर्ग पर्यंतच्या आणि घाटमाथ्यावरील गगनबावडा तालुक्यालाही वैभववाडी रोड रेल्वे स्थानकाचा मोठा आधार आहे. या स्थानकातून दररोज हजारो प्रवाशाची ये-जा सुरु आहे. तरीही येथे दिवा, मांडवी, तुतारी आणि कोकणकन्या या चारच रेल्वेगाड्यांना थांबा आहे. यामध्ये मागील १५ नियमित गाडीच्या थांब्याची वाढ होऊ शकलेली नाही. यांचे मूळ राजकीय उदासीनता हेच आहे.

आरक्षण खिडकी ५ वर्षांपासून बंदच!कोविडमुळे मार्च २०२० मध्ये देशव्यापी लॉकडाऊन झाले. त्यावेळी बंद झालेली वैभववाडी रेल्वे रोड रेल्वे स्थानकातील आरक्षण खिडकी पाच वर्षांपासून बंदच आहे. त्यामुळे मुंबई व उपनगरात जाणाऱ्या प्रवाशांना ४०० रुपयांचे तिकिट आरक्षित करण्यासाठी वैभववाडीतून ३०० ते १५०० रुपये आणि अर्धा दिवस खर्चून ३५ किलोमीटरवर कणकवलीत जावे लागते. त्यातूनच जाणं लांबलं किंवा रद्द झाले तर पुन्हा तेवढाच वेळ आली पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे बऱ्याचअंशी तिकिट रद्द करण्याच्या भानगडीतच पडत नाहीत. त्यामुळे न केलेल्या प्रवासासाठी जवळपास २००० रुपयांचा भुर्दंड पडतोय. परंतु, रेल्वे प्रवाशांची होत असलेली गैरसोय, आर्थिक नुकसान आणि त्रासाविषयी कुणाला काहीही देणेघेणे नाही हे मागील ५ वर्षात प्रकर्षाने दिसून आले.

छप्पर, बैठक व्यवस्था आणि स्वच्छतेची वानवावैभववाडी रोड रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर छप्पर नाही. ऊन्ह आणि पावसाळ्यात प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. उन्हाळ्यात गडी प्लॅटफॉर्मवर येत असताना बॅग, व अन्य सामानाची पिशवी हातात घेऊन थांबलेल्या प्रवाशांच्या अंगातून निघणाऱ्या घामाच्या धारा आणि पावसाळ्यात भिजून चिंब झालेले प्रवाशी पाहताना वैभववाडी स्थानकाला कै. बंडू मुंडल्येंच्या पश्चात कोणीच वाली उरला नसल्याची जाणीव होते. त्यामुळेच प्रवाशांना गाडीची वाट पाहत प्लॅटफॉर्मवर जाणाऱ्या पायऱ्यांवर बसावे लागत आहे.पादचारी पूलाची गती कासवाला लाजविणारीवैभववाडी रेल्वे स्थानकाच्या दोन्ही प्लॅटफॉर्मवर ये-जा करणे सुलभ व्हावे, यासाठी रेल्वे प्रशासनाने पादचारी पूल मंजूर करुन घेतला. त्याचे भूमिपूजन विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वी १३ ऑक्टोबरला करण्यात आले. त्यामुळे चार पाच महिन्यांत पादचारी पूल पूर्ण होईल, या भाबड्या आशेने प्रवासी सुखावले होते. परंतु, भूमिपूजन होऊन सहा महिने होत आले तरी पादचारी पुलाचा पत्ता नाही. या पादचारी पूल कामाची गती अक्षरशः कासवालाही लाजविणारी आहे. त्यामुळे हा पूल पूर्ण होऊन प्रवाशांना खुला होण्यास निश्चित किती महिने, वर्ष जातील याचा ठामपणे अंदाज सांगणे मुश्किल आहे. 

अजून किमान २ गाड्यांना थांबा आवश्यकसकाळी ८.३० च्या तुतारीनंतर सायंकाळी ४ वा. येणारी मांडवी, दिवा पॅसेंजर आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कोकणकन्यापर्यंत मुंबई व उपनगरातून येणारी एकही रेल्वे वैभववाडी स्थानकात थांबत नाही. तशीच दुपारच्या मांडवी नंतर रात्री तुतारी, कोकणकन्या नंतर दुसऱ्या दिवशी दिवा पॅसेंजर पर्यंत मुंबईकडे जाणाऱ्या एकाही जलद गाडीला येथे थांबा नाही. त्यामुळे आजारी व्यक्ती किंवा दुःखद प्रसंगावेळी प्रचंड आर्थिक भुर्दंड बसतो. त्यामुळे दुपारी १२ ते १ वा. आणि रात्री ९-१० वा मुंबईहून येणाऱ्या तसेच सकाळी ६-७ वा. आणि सायंकाळी ५-६ वा वैभववाडी स्थानकावरुन मुंबईकडे जाणाऱ्या दोन जलद गाड्यांना थांबा व आरक्षण कोठा मिळण्याची गरज आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गvaibhavwadiवैभववाडीrailwayरेल्वे