शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वैभव नाईकांनी 'सिंधुरत्न'ची काळजी करू नये - दीपक केसरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 18:31 IST

लवकरच सिंधुरत्न'ला मुदतवाढ 

सावंतवाडी: सिंधुरत्न योजनेला मुदतवाढ मिळायची आहे. हिशोब तपासणीची कार्यवाही सुरू आहे. त्यानंतर ही मुदतवाढ मिळणार आहे. स्थगितीचा विषय नसून वेळ पडली तर पालकमंत्री नितेश राणे, अर्थमंत्री अजित पवारांकडे येतील याची मला खात्री आहे. त्यामुळे माजी आमदार वैभव नाईक यांनी त्याची काळजी करू नये असा खोचक टोला आमदार दीपक केसरकर यांनी लगावला. ते शनिवारी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केसरकर म्हणाले, रेल्वे टर्मिनस सावंतवाडीत की मडुरा येथे असा वाद होता. टर्मिनस सावंतवाडीतच असल्यानं गाडी तिथून सुटते व थांबते. रेल्वे टर्मिनसच्या उर्वरीत कामासाठी आणखी निधीची गरज आहे. कोकण रेल्वेची आर्थिक परिस्थिती नसल्यानं ते रखडल‌. त्यामुळे सिंधुरत्न मधून निधी देण्याची सोय केली आहे. पाण्याची समस्या होती. ती  अडचण देखील आम्ही दूर केली असल्याचे केसरकर यांनी सांगितले.दोनच भाषा सक्तीच्या महाराष्ट्रात हिंदी सक्ती नाही. पाचवी नंतर हिंदी  विषय अभ्यासक्रमात शिकवला जातो हे फार आधीपासून आहे. नवीन शैक्षणिक धोरणात पहिली ते चौथीसाठी पर्यायी भाषा आहेत. सुकाणू समितीनं याबाबत निर्णय घेतला आहे. मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषा सक्तीच्या आहेत. कुठली भाषा घ्यावी हे विद्यार्थ्यांवर असेल नऊ आंतरराष्ट्रीय भाषा विद्यार्थी शिकू शकता. मात्र, मराठी भाषा ही शिकावीच लागेल. राज ठाकरे यांना चुकीची माहिती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं हा कौटुंबिक प्रश्न आहे. मात्र, मराठी ही सक्तीचीच आहे. १२ वी नंतरही पुढचं शिक्षण मराठीत व्हावं यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण सुद्धा मराठीतुन घेता येणार आहे. मराठीसाठी आमच्या काळात जे केलं ते कोणीही केलेल नाही. राज ठाकरे यांना काही माहिती चुकीची दिली आहे. त्यांची भेट घेऊन संपूर्ण वस्तूस्थिती सांगितली पाहिजे. त्यानंतर त्यांनी हा मोर्चा मागे घ्यावी अशी अपेक्षा आहे. तर मुलांच्या पुस्तकांचा बोजा सरकारनं कमी करावा ही माझी मागणी कायम असल्याचे केसरकर म्हणाले. शक्तीपीठ महामार्गाचा आराखडा बदलावाशक्तीपीठ महामार्गाचा आराखडा बदलण्यात यावा अशी मी मागणी केली असून लवकरच एमएमआरडीएची टीम सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहे. रेडी बंदाराला हा रस्ता जोडाला गेल्यास यांचा फायदा होईल. हा मार्ग शक्तीपीठाला जोडणारा आहे. या महामार्गाचा कोकणाला फायदा होण्यासाठी माझा प्रयत्न आहे. बांदा ही बाजारपेठ गजबजलेली आहे. तिथे होणारे नुकसान देखील यामुळे टळू शकेल असं मत केसरकर यांच्याकडून व्यक्त करण्यात आले. दरम्यान, सातार्डा पुल दूरूस्ती सुचना आपण अधिकारी वर्गांला देणार आहे. आंबोलीत दुर्घटना घडू नयेत यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन टीम तैनात आहेत. यासाठी आवश्यक कीट त्यांना पुरविण्यात आल्याची माहिती केसरकर यांनी दिली.