शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

वैभव नाईक यांनी शेवटचे काही महिने आमदारकी एन्जॉय करावी, समीर नलावडे यांचा उपरोधिक टोला

By सुधीर राणे | Updated: June 12, 2024 15:55 IST

ते कोणाच्या संपर्कात होते ?

कणकवली: रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे यांना कणकवली शहरात विनायक राऊत यांच्यापेक्षा १,७१७ चे मताधिक्य मिळाले. उद्धवसेनेचे नेते आमदार वैभव नाईक आणि संदेश पारकर यांना आम्ही आव्हान देवून देखील त्यांनी ते स्विकारले नाही. पारकर बंधू व नाईक यांनी राऊत यांना या निवडणुकीत पराजित करण्याचे काम केले. नाईक यांनी शेवटचे २-३ महिने आपली आमदारकी एन्जॉय करावी, असा उपरोधिक टोला समीर नलावडे व बंडू हर्णे यांनी लगावला. कणकवली शहर भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नलावडे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांना चांगले मताधिक्य मिळाल्याने भाजपाचे नगरसेवक, कणकवलीतील सर्व पदाधिकाऱ्यांवर शहरातील जनतेने विश्वास दाखवला आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आजपर्यंतच्या इतिहासात कणकवली शहरामध्ये १,७१७ असे मताधिक्य कोणत्याही निवडणूकीमध्ये कुठच्याच उमेदवाराला मिळालेले नाही. ते मताधिक्य राणेंवर तसेच नरेंद्र मोदी सरकारवर विश्वास ठेवून मिळाले आहे. कणकवली शहराच्या विकासाच्या बाबतीत नारायण राणे,  पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून जो निधी आला व या अडीच वर्षात जो विकास झाला त्याची पोचपावती म्हणून हे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे फक्त प्रसिद्धी माध्यमांसमोर आमच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांची तोंडे बंद झाली आहेत असेही ते म्हणाले.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक संचालक विठ्ठल देसाई, माजी नगरसेवक संजय कामतेकर, किशोर राणे, मेघा गांगण, राजश्री धुमाळे आदी भाजप पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. ते कोणाच्या संपर्कात होते ?आमदार वैभव नाईक हे कोणाच्या संपर्कात होते? ते आम्हाला माहित नाही. मात्र, त्यांच्या विधानसभा मतदारसंघातही नारायण राणे यांना मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे वैभव नाईक यांनी  शेवटचे २-३ महिने आपली आमदारकी एन्जॉय करावी , असा उपरोधिक टोला समीर नलावडे व बंडू हर्णे यांनी यावेळी लगावला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवलीVaibhav Naikवैभव नाईक Vinayak Rautविनायक राऊत Narayan Raneनारायण राणे