शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याही दबावाला भीक घालणार नाही, एसीबी चौकशी प्रकरणी वैभव नाईकांची स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 16:38 IST

सामान्य लोकांना झालेल्या त्रासाबद्दल मी त्यांची माफी मागतो

कणकवली : माझी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)च्या माध्यमातून गेले चार महिने चौकशी सुरू आहे. आता माझ्या आमदार फंडातून ज्या ग्रामपंचायतींनी व ठेकेदारांनी कामे केली. त्यांना चौकशीची नोटीस पाठविण्यात आली आहे. त्याला माझा आक्षेप नाही. मात्र, या चौकशीचे जे कोणी सूत्रधार आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की, अशा दबावाला आम्ही भीक घालत नाही. आम्ही चौकशीला पूर्ण सहकार्य करू. तसेच शिवसेनेचे काम जोमाने यापुढेही करीत राहू, अशी आपली भूमिका आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केली आहे.याबाबत त्यांनी सोमवारी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले,  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रत्नागिरी येथील उपअधीक्षकांकडून चौकशी सुरू आहे. लाच लुचपत प्रतिबंधकच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून आमच्या मालमत्तेबाबत चौकशी केली जात आहे.या चौकशीला संपूर्ण सहकार्य करणार आहोत.  आता माझ्या आमदार फंडातून ज्या ग्रामपंचायतींनी व ठेकेदारांनी कामे केली. त्यांना चौकशीची नोटीस पाठविण्यात आली आहे. साधारणतः २०० सामान्य लोकांना नोटिसा दिल्या आहेत. त्यांना रत्नागिरी येथे चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. ही चौकशी  कुडाळ येथील कार्यालयात करता आली असती; पण तसे झालेले नाही.  

सामान्य लोकांना झालेल्या त्रासाबद्दल मी त्यांची माफी मागतो. त्यांनी चौकशीला सामोरे जावे. तसेच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला अपेक्षित ती माहिती द्यावी. मात्र, चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही यापुढील काळात ज्यांची चौकशी करायला सांगू त्यांचीही चौकशी करावी लागेल. सत्ता ही बदलत असते, हेही त्यांनी लक्षात घ्यावे. कोणत्याही दबावाला आम्ही बळी पडणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागVaibhav Naikवैभव नाईक