शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीवासीयांच्या सेवेत लवकरच अद्ययावत अग्निशामक बंब, नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती

By सुधीर राणे | Updated: May 3, 2023 14:19 IST

कणकवली : कणकवली शहरवासीयांच्या सेवेत नगरपंचायतीचा ८९ लाख ९२ हजारांचा नवीन अद्ययावत अग्निशामक बंब लवकरच दाखल होणार आहे. त्यामुळे ...

कणकवली : कणकवली शहरवासीयांच्या सेवेत नगरपंचायतीचा ८९ लाख ९२ हजारांचा नवीन अद्ययावत अग्निशामक बंब लवकरच दाखल होणार आहे. त्यामुळे भविष्यात आगी सारख्या आपत्तीचे व्यवस्थापन चांगल्याप्रकारे करण्यासाठी अग्निशामक बंबाची मदत होईल अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.कणकवली नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी  उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेविका मेघा गांगण, विराज भोसले, महेश सावंत, किशोर राणे, अजय गांगण आदी उपस्थित होते.यावेळी नलावडे म्हणाले, कणकवली नगरपंचायतने गेल्या दोन महिन्यांपूर्वी जुना अग्निशामक बंब नादुरुस्त झाल्याने निर्लेखित केला आहे. त्यानंतर नगरपंचायतीने राज्य शासनाकडे नवीन अग्निशामक बंब खरेदीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यामुळे नवीन अद्ययावत अशा अग्निशामक बंबासाठी ८९ लाख ९२ हजारांचा निधी उपलब्ध झाला आहे. येत्या दीड ते दोन महिन्यात अग्निशामक बंब आपल्याला उपलब्ध होणार आहे. १९ टन वजन वाहून नेण्याची क्षमता असलेला आणि  व १ हजार फोम व ६ हजार लिटर पाणी साठा करू शकणारा हा बंब आहे. इंजिन पॉवर १८० एचपी व शिडीची लांबी १०.५  मीटर आहे. बंबाच्या  केबिन मध्ये चालक आणि ४ कर्मचारी बसण्याची व्यवस्था आहे. या बंबाद्वारे २००० लिटर प्रती मिनीट  पाणी फवारणी करू शकतो. बंबात प्रथोमोपचार पेटीही उपलब्ध असणार असल्याचे नलावडे यांनी सांगितले.बंडू हर्णे म्हणाले, कणकवली शहरात २४ तास कार्यान्वित असलेले अग्निशामक केंद्र तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी भूसंपादन प्रस्ताव तयार केला आहे. भूसंपादन अधिकारी लवकरच संबंधित जमीन मालकांना मोबदल्याचे वाटप करणार आहेत. त्यासाठी नगरपंचायतने ४ कोटी ७० लाखांचा निधी दिला आहे. या केंद्राच्या ठिकाणी अग्निशामक दलाच्या गाड्या उभ्या राहतील. याठिकाणी कर्मचाऱ्यांची निवास व्यवस्था असेल. जेणेकरून आपत्ती झाल्यानंतर तातडीने अग्निशामक दलाची गाडी रवाना होईल. हा प्रकल्प लवकर पूर्ण होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भूसंपादन झाल्यावर शासनाकडून एक कोटींचा निधी तत्काळ नगरपंचायतीला मिळेल असे बंडू हर्णे यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली