शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

..तोपर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही - मनीष दळवी 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: December 29, 2023 19:28 IST

सिंधुदुर्ग : आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्याला जर आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचे असेल तर त्याला शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. आणि ...

सिंधुदुर्ग : आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्याला जर आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचे असेल तर त्याला शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. आणि जोपर्यंत शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाही तोपर्यंत आपला जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही, असे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी जिल्हा बँकेतील गोपाळ सेवा दाता प्रतिनिधी यांच्या आढावा बैठकीत व्यक्त केले.सिंधुदुर्ग जिल्हा बँक, जिल्हा परिषद- सिंधुदुर्ग, गोकुळ दूध संघ- कोल्हापूर व भगिरथ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गोपाळ सेवा दाता प्रतिनिधी यांची आढावा बैठक सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भाईसाहेब सावंत सभागृहात जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुधाकर ठाकूर, डॉ. विद्यानंद देसाई, डॉ. तुषार वेंगुर्लेकर, डॉ. संतोष कुडतरकर, डॉ. गावकर, जिल्हा बँकेचे अधिकारी व जिल्ह्यातील गोपाळ सेवा दाता लाभार्थी उपस्थित होते.यावेळी दळवी म्हणाले की, गोपाळ सेवा दाता म्हणून काम करीत असताना जिल्हा बँक, जिल्हा परिषद, भगीरथ प्रतिष्ठान व गोकुळ प्रतिष्ठानचे एक प्रतिनिधी या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी तुमच्याकडे बघितले पाहिजे, असे काम तुमच्याकडून केले गेले पाहिजे.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर म्हणाले, जिल्हा बँकेने जो विश्वास तुमच्यावर टाकलेला आहे तो विश्वास गोपाळ सेवादाता म्हणून काम करीत असताना गावातील पशुधनपालक शेतकऱ्यांना वाटला पाहिजे. ही फार मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे, असे सांगून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कामाचा अनुभव कथनडॉ. प्रसाद देवधर यांनी आपले मनोगत व्यक्त करून उपस्थितांना या विषयाची माहिती दिली. त्यानंतर ३६ दिवसांच्या प्रशिक्षण कालावधीतील व प्रत्यक्ष काम करीत असताना आलेले अनुभव गोपाळ सेवा दाता देवेंद्र पाताडे, शुभम कवठणकर, प्राची गुरव, अंकुश माजगावकर, रामदास भोगले, रूपेश गावकर, प्रथमेश पाटील यांनी कथन केले. जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गbankबँकFarmerशेतकरी