शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तोपर्यंत वीजबिल वसूली थांबविण्याच्या ग्रामविकास मंत्र्यांच्या वीज वितरणला सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 16:31 IST

mahavitaran Sindhudurg : ग्रामपंचायतींच्या स्ट्रीट लाईटच्या थकीत बिलाबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून ग्रामविकास विभागामार्फत स्ट्रीट लाईटची थकीत बिले भरण्याची मागणी केली आहे. ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायतना १५ वा वित्त आयोगमधून ही थकीत बिले भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र ग्रामपंचायतींचे एवढे उत्पन्न नसल्याने ही बिले भरणे ग्रामपंचायतींना शक्य नाही. दरवर्षी ग्रामविकास विभागामार्फत स्ट्रीट लाईटची बिले भरली जातात. याकडे आमदार वैभव नाईक यांनी मुश्रीफ यांचे लक्ष वेधले.

ठळक मुद्देतोपर्यंत वीजबिल वसूली थांबविण्याच्या वीज वितरणला सूचनाआमदार वैभव नाईक यांनी मुश्रीफ यांचे वेधले लक्ष

कणकवली : ग्रामपंचायतींच्या स्ट्रीट लाईटच्या थकीत बिलाबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून ग्रामविकास विभागामार्फत स्ट्रीट लाईटची थकीत बिले भरण्याची मागणी केली आहे.

ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायतना १५ वा वित्त आयोगमधून ही थकीत बिले भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र ग्रामपंचायतींचे एवढे उत्पन्न नसल्याने ही बिले भरणे ग्रामपंचायतींना शक्य नाही. दरवर्षी ग्रामविकास विभागामार्फत स्ट्रीट लाईटची बिले भरली जातात. याकडे आमदार वैभव नाईक यांनी मुश्रीफ यांचे लक्ष वेधले.आमदार वैभव नाईक यांच्या मागणीची दखल घेऊन हसन मुश्रीफ यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा करून ग्रामपंचायत स्ट्रीट लाईटची किती बिले थकीत आहेत. याचा अहवाल १५ दिवसांत ग्रामविकास विभागाकडे देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तोपर्यंत ग्रामपंचायतींकडे थकीत बिलासाठी तगादा लावू नये, वीज कनेक्शने देखील कट करू नये. अशा सूचना वीज वितरण विभागाला देण्यात आल्या आहेत.

ग्रामपंचायत स्ट्रीट लाईटच्या थकीत बिला संदर्भात १५ दिवसात पुढील निर्णय होणार असल्याची माहिती कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणHasan Mushrifहसन मुश्रीफVaibhav Naikवैभव नाईक sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली