देवगड : देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या बांधकाम सभापतीपदी बापू जुवाटकर, स्वच्छता आरोग्य सभापतीपदी संजय तारकर तर महिला-बालकल्याण सभापतीपदी प्राजक्ता घाडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.देवगड जामसंडे नगरपंचायत विषय समिती सभापतीपदांची निवडणूक ३० डिसेंबर रोजी पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायत कार्यालयात पार पडली. यावेळी मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे उपस्थित होते.नगरपंचायतीच्या बांधकाम सभापतीपदी बापू जुवाटकर, तर सदस्यपदी उज्ज्वला अदम, नीरज घाडी, रोहिणी तोडणकर, स्वच्छता आरोग्य शिक्षण सभापतीपदी संजय तारकर तर सदस्यपदी म्हणून योगेश चांदोस्कर, उमेश कणेरकर, ए. वाय. जाधव, महिला-बालकल्याण सभापतीपदी प्राजक्ता घाडी, उपसभापतीपदी विशाखा पेडणेकर तर सदस्यपदी श्रुती जाधव, प्रणाली माने, रोहिणी तोडणकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांनी जाहीर केले. निवड झालेल्या विषय समिती सभापती व उपसभापतींचे भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, नगराध्यक्षा प्रियांका साळसकर आदींनी अभिनंदन केले.
देवगड सभापतीपदांची निवड बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 19:17 IST
Devgad nagerpanchyat sindhudurg- देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या बांधकाम सभापतीपदी बापू जुवाटकर, स्वच्छता आरोग्य सभापतीपदी संजय तारकर तर महिला-बालकल्याण सभापतीपदी प्राजक्ता घाडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
देवगड सभापतीपदांची निवड बिनविरोध
ठळक मुद्देदेवगड सभापतीपदांची निवड बिनविरोधविषय समिती सभापतीपदी निवड