कणकवली : सुडाचे राजकारण विरोधकांनी सुरू केले असले तरी त्याचा शेवट मीच करणार असल्याचा इशारा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी दिला. तर, मालवणमधील निलरत्न बंगल्यातील अनधिकृत बांधकाम प्रकरणी आपल्याला कोणतीही नोटीस आली नसल्याचेही त्यांनी सांगितले.कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथिल महिला भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.मंत्री राणे म्हणाले, माझा बंगला तोडायची कोणाची हिम्मत नाही. सर्व अटींची पूर्तता करून मालवणचा निलरत्न बंगला बांधला आहे. त्यात काहीही अनधिकृत नाही. अधिकृत असल्यामुळेच आम्हाला त्यावेळी भोगवटदार पत्र मिळाले. दुसरी गोष्ट मालवणच्या बंगल्याला कोणतीही नोटीस नाही. मुंबई आणि मालवण येथे कसलेही अनधिकृत बांधकाम नाही. मात्र,आमची नाहक बदनामी केली जात आहे. अशी बदनामी करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस दिली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.कोणतीही बातमी दुसऱ्याच्या दुःखात भर टाकण्यासाठी असू नये. कोकण आणि मालवणी लोक तक्रारींचे समर्थन करायला असतात. मात्र, चांगले काम केले तर अभिनंदन करायला कोण येत नाही. असेही ते म्हणाले.मलिकांचे अनेक 'गँग'शी संबधमंत्री नवाब मलिक यांच्याबद्दल बोलतांना राणे म्हणाले, त्यांच्या बाबतीत कधी ना कधी हे होणारच होते. मलिक यांचे आजचे संबध नाहीत. अनेक वर्षांचे संबंध आहेत आता डी, आणि ए की आणखी काही गॅंग शी त्यांचे संबध आहेत ते उघड होतील. यानंतर अजून अनेकांचे नंबर लागतील. हळूहळू सर्व कळेल. नवाब मालिकांचे अनुकरण कोणी करू नये.आता काय ते बोला म्हणावे त्यांना ईडी समोर, नाहीतर तोंडात विडी देणार ते ईडीवाले अशी मिस्कील टीकाही यावेळी मंत्री नारायण राणे यांनी केली.राऊतांची मानसिक स्थिती बिघडलीतसेच खासदार संजय राऊत हे बेजबाबदारपणे बोलणार आणि आम्ही त्याला उत्तरे का द्यावीत. त्यांची मानसिक स्थिती चांगली नाही.दिशा सालीयन संदर्भात राणे म्हणाले, दिशाला ज्याने मारले त्यांना शिक्षा व्हावी म्हणून आम्ही बोलतोय. दिशा सालीयनच्या नातेवाईकांची या पूर्वी काय भूमिका होती ? हे सुद्धा आम्हाला माहीत आहे. त्यामुळे योग्य न्यायासाठी आम्ही बोलत आहोत.
सुडाच्या राजकारणाचा शेवट मीच करणार!, केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 16:49 IST