नाधवडे येथे शेतकºयांसाठी उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 19:51 IST2017-10-08T19:50:50+5:302017-10-08T19:51:32+5:30
वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील श्री चवाटी माता मित्रमंडळातर्फे शेतकºयांना टोपी वाटप व विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण सोहळा विविध मान्यवरांच्या हस्ते पार पडला.

नाधवडे येथे शेतकºयांसाठी उपक्रम
तळेरे 8 : वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील श्री चवाटी माता मित्रमंडळातर्फे शेतकºयांना टोपी वाटप व विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण सोहळा विविध मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
सातत्याने काहीतरी वेगळा उपक्रम राबविणे हेच उद्दिष्ट घेऊन चालणाºया या मंडळाने प्रदीप ढवण यांच्या सौजन्याने यावर्षी गावातील शेतकºयांना टोप्यांचे वाटप केले. या मंडळाच्यावतीने शालेय मुला-मुलींसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. तसेच होम मिनिस्टर या स्थानिक कार्यक्रमाचे आयोजन करुन महिलांसाठी लकी ड्रॉ घेऊन विजेत्या महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या.
या कार्यक्रमाच्या बक्षिस वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नाधवडेचे सरपंच दादा पावस्कर, सी. एम. सी. मंडळाचे आधारस्तंभ बंडू मुंडल्ये, तंटामुक्ती समिती अध्यक्ष रमाकांत पांचाळ, समाजसेवक प्रदीप ढवण, गावचे मुख्य किशोर कुडतरकर व गावचे मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात लेखक, नाटककार, दिग्दर्शक लक्ष्मण सखाराम घाडी यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. बंडू मुंडल्ये आणि मंडळाचे अध्यक्ष संदीप कुडतरकर यांनी मनोगत व्यक्त केले.
नाधवडे येथील श्री चवाटी माता मित्रमंडळातर्फे आयोजित विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. (छाया : निकेत पावसकर)