शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

साकेडी फाटा येथे अंडरपासचे काम सुरू : नागवे, करंजेसह दशक्रोशीतील ग्रामस्थांमधून समाधान  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 17:49 IST

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात कणकवली तालुक्यातील हुंबरटजवळील साकेडी फाटा येथे प्रस्तावित असलेल्या अंडरपासचे काम अखेर केसीसी बिल्डकॉन व महामार्ग प्राधिकरणामार्फत सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमहामार्ग चौपदरीकरण

सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात कणकवली तालुक्यातील हुंबरटजवळील साकेडी फाटा येथे प्रस्तावित असलेल्या अंडरपासचे काम अखेर केसीसी बिल्डकॉन व महामार्ग प्राधिकरणामार्फत सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे साकेडीसह या मार्गाला जोडणाºया नागवे, करंजेसह दशक्रोशीतील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. गेले दोन दिवस या कामाच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू करण्यात आली होती. त्यादृष्टीने अंडरपासचे काम करीत असताना वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पर्यायी मार्ग तयार करण्यात आला आहे. त्याद्वारे वाहतूक वळविण्यात आली आहे. 

साकेडी फाटा येथे चौपदरीकरण आराखड्यात मंजूर असलेला अंडरपास रद्द करण्याबाबत गेल्या काही महिन्यांपूर्वी हालचाली सुरू होत्या. मात्र, याबाबत साकेडी ग्रामस्थांसह नागवे, करंजे दशक्रोशीतील ग्रामस्थ व तीन गावांच्या सरपंचांनी हा अंडरपास रद्द केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे याबाबत महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाºयांनी याठिकाणी येत पाहणी करीत साकेडी,  करंजे, नागवे ग्रामस्थांसोबत चर्चा केली व संबंधित  ठिकाणी अंडरपास मंजूर असल्याने तो रद्द करण्याचे प्रस्तावित नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच याबाबत तीनही सरपंच व ग्रामस्थांना तसे लेखी आश्वासन दिले होते. मंजूर आराखड्याप्रमाणे काम करण्याची मागणीदरम्यान, हुंबरटमधील महामार्गालगत येत असलेल्या काही व्यापारी व ग्रामस्थांनी अंडरपास रद्द करून त्याठिकाणी भुयारी मार्ग किंवा सर्कल ठेवण्याची मागणी  करीत अंडरपासच्या कामाला विरोध केला होता. त्यानंतर काहीवेळा हे काम बंदही पाडण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच खासदार विनायक राऊत यांनी या ठिकाणी भेट देत पाहणी केली होती. तसेच साकेडी ग्रामस्थांशी याबाबत चर्चा केल्यानंतरच अंडरपास रद्द करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते.     मात्र, साकेडी ग्रामस्थ व सरपंच हे आपल्या मागणीप्रमाणेच व मंजूर आराखड्याप्रमाणेच काम करण्याच्या मागणीवर ठाम राहिल्याने अखेर या अंडरपासचे काम सुरू करण्यात आले आहे.  

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्ग