शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत वाळू उपसा करणारी होडी पेटविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 16:40 IST

मालवण तालुक्यातील कोईल गावालगतच्या कालावल खाडीपात्रात अनधिकृतरित्या संक्शन पंपाद्वारे वाळू उपसा व वाहतूक केल्याप्रकरणी महसूलच्या पथकाने धडक कारवाई केली. यात संक्शन पंप, लोखंडी पाईप व होडीमध्ये डिझेल ओतून आग लावून ती पेटवून देण्यात आली. तहसीलदार अजय पाटणे यांच्या उपस्थितीत ही कारवाई केली.

ठळक मुद्देअनधिकृत वाळू उपसा करणारी होडी पेटविलीसखोल चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी

मालवण : तालुक्यातील कोईल गावालगतच्या कालावल खाडीपात्रात अनधिकृतरित्या संक्शन पंपाद्वारे वाळू उपसा व वाहतूक केल्याप्रकरणी महसूलच्या पथकाने धडक कारवाई केली. यात संक्शन पंप, लोखंडी पाईप व होडीमध्ये डिझेल ओतून आग लावून ती पेटवून देण्यात आली. तहसीलदार अजय पाटणे यांच्या उपस्थितीत ही कारवाई केली.कोईल गावात गेले काही दिवस मध्यरात्री वाळू उत्खनन वाहतुकीसाठी संक्शन पंप आणल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. त्यांनी पाहणी केली असता कोणतीही परवानगी नसताना खाडीपात्रात संक्शन पंप लावून वाळूचा उपसा होत असल्याने ग्रामस्थ संतप्त बनले.

काल काही ग्रामस्थांनी एकत्र येत थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यानुसार अनधिकृत संक्शन पंप व वाळू उपसा पाहणी करून कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार पाटणे यांनी मंडळ अधिकारी, तलाठी या महसूलच्या पथकाला दिले.शुक्रवारी दुपारी ग्रामस्थांच्या उपस्थितीत मंडळ अधिकारी के. एच. पोकळे, तलाठी पी. डी. मसुरकर, टी. जी. गिरप, पोलीस पाटील रामचंद्र साटम यांच्या उपस्थितीत कोईल गावातील खाडीकिनारी महसूल पथकाने पाहणी केली. यावेळी एका लोखंडी होडीत संक्शन पंप व साहित्य तसेच सुमारे दोनशे मीटर अंतरावर लोखंडी पाईप दिसून आला. हा पाईप ज्या ठिकाणी होता त्या किनारी काही वाळू रॅम्प व मुख्य रस्त्याला जोडणारा कच्चा रस्ता होता. या ठिकाणाहून रात्री अनधिकृत उपसा केलेली वाळू ट्रक, डंपर सहाय्याने वाहतुकीचा मार्ग केला असल्याचे दिसून आले.संक्शन पंपाद्वारे मोठ्या प्रमाणावर उपसा केलेली वाळू थेट किनारी आलेल्या डंपरमध्ये भरली जाते. त्यामुळे मनुष्यबळ वाचते. तसेच अवघ्या काही वेळेत डंपर भरला जातो. गेले काही दिवस मध्यरात्री वाळू उपसा सुरू असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. तरी याप्रकरणी सखोल चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती.

टॅग्स :sandवाळूCrime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग