शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

उमेश यादव आत्महत्या प्रकरण; मृत्यूपूर्वीची चिठ्ठी पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 10:30 IST

सावंतवाडी येथील विद्युत विभागाचे खासगी ठेकेदार उमेश यादव आत्महत्या प्रकरणी पोलिसांचा तपास ज्या चिठ्ठीभोवती फिरत होता, ती चिठ्ठी अखेर सोमवारी कुटुंबाने पोलिसांच्या स्वाधीन केली आहे. मात्र, या चिठ्ठीत विशेष असे काहीच नसून, कोणत्याही संशयित व्यक्तींची नावे नसल्याचे पोलिसांनी पत्रकारांना सांगितले.

ठळक मुद्देउमेश यादव आत्महत्या प्रकरण; मृत्यूपूर्वीची चिठ्ठी पोलिसांच्या ताब्यातसावंतवाडी येथील घटना : पोलिसांकडून चौकशी सुरू

सावंतवाडी : येथील विद्युत विभागाचे खासगी ठेकेदार उमेश यादव आत्महत्या प्रकरणी पोलिसांचा तपास ज्या चिठ्ठीभोवती फिरत होता, ती चिठ्ठी अखेर सोमवारी कुटुंबाने पोलिसांच्या स्वाधीन केली आहे. मात्र, या चिठ्ठीत विशेष असे काहीच नसून, कोणत्याही संशयित व्यक्तींची नावे नसल्याचे पोलिसांनी पत्रकारांना सांगितले.उमेश यादव यांनी चार दिवसांपूर्वी मोती तलावात आत्महत्या केली होती. या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले होते. तपास स्थानिक पोलिसांकडून काढून घेऊन स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे दिला होता. स्था

निक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक तसेच त्यांचे पथक सावंतवाडीत ठाण मांडून असून, ते तपास करीत आहेत. त्यामुळे सध्यातरी हे प्रकरण येथेच थांबले असून आता पोलीस मृत उमेश यांना मृत्यूच्यापूर्वी फोन केले होते का याची माहिती घेणार असून त्याचे सीडीआरही पाठविल्याचे सांगितले.

या प्रकरणात आणखी काय माहिती मिळते का? याचीही खातरजमा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या या प्रकरणाबाबत दररोज आम्ही पोलीस अधीक्षक व उपअधीक्षक यांना माहिती देत असून तेही आम्हांला मार्गदर्शन करीत असल्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन शेळके यांनी सांगितले.पोलिसांकडून त्या चिठ्ठीची शहानिशापहिले काही दिवस या प्रकरणाचा तपास उमेश यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीभोवती फिरत होता. मात्र, कुटुंबाने आपली सध्या मानसिक स्थिती चांगली नसल्याने आपण चिठ्ठी देऊ शकत नाही असे सांगितले होते. मात्र, सोमवारी ही चिठ्ठी कुटुंबाने पोलिसांच्या स्वाधीन केली असून, पोलिसांनी या चिठ्ठीची शहानिशा केली. मात्र, त्यात विशेष असे काहीच नसल्याचे सांगितले. तसेच सावंतवाडीत ज्या उलटसुलट अफवा पसरविल्या जात होत्या, तशी नावेही कोणाची नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSawantwadiसावंतवाडीPoliceपोलिसsindhudurgसिंधुदुर्ग