"सत्तेच्या उबेसाठी श्रद्धाही नाही सबुरीही विसरलेत"; उद्धव ठाकरेंकडून केसरकरांचा समाचार

By अनंत खं.जाधव | Updated: February 4, 2024 16:18 IST2024-02-04T16:10:33+5:302024-02-04T16:18:56+5:30

महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काय बोलणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले होते.

Uddhav Thackeray Slams Deepak Kesarkar and narayan rane in Sindhudurg | "सत्तेच्या उबेसाठी श्रद्धाही नाही सबुरीही विसरलेत"; उद्धव ठाकरेंकडून केसरकरांचा समाचार

"सत्तेच्या उबेसाठी श्रद्धाही नाही सबुरीही विसरलेत"; उद्धव ठाकरेंकडून केसरकरांचा समाचार

सावंतवाडी :शिवसेना कोणाची हे गद्दारांनी ठरवण्याची गरज नाही, जनतेला माहीत आहे. जनता हेच माझे सर्वस्व आहे. आठवड्यातून दोनदा शिर्डीला जाणारे सत्तेच्या उबेसाठी श्रध्दा आणि सबुरी विसरतात नसानसात गद्दारी भरलेल्याना जनताच धडा शिकवेल अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर नाव न घेता हल्ला चढवला तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा ही शेलक्या शब्दात समाचार घेतला. ते सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेत बोलत होते.

यावेळी शिवसेना नेते खासदार विनायक राऊत आमदार भास्करराव जाधव वैभव नाईक वरूण सरदेसाई मिलिंद नार्वेकर गौरीशंकर खोत अरूण दुधवडकर जान्हवी सावंत जिल्हाप्रमुख संजय पडते संदेश पारकर सतिश सावंत अतुल रावराणे शैलेश परब रूपेश राऊळ बाळा गावडे सुशांत नाईक मंदार शिरसाट संजय गवस यशवंत परब सुकन्या निरसुले श्रृतिका दळवी भारती कासार आदि उपस्थित होते.

महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काय बोलणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले होते.ते आपल्या भाषणात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा समाचार घेणार हे निश्चित मानले जात होते त्याप्रमाणे त्यांनी केसरकर यांच्यावर जोरदार टीका केली आठवड्यातून दोन वेळा शिर्डीला जातात पण सत्तेच्या उब मिळाली कि श्रध्दा आणि सबुरी ही विसरतात या डबल गद्दारांना जनता सोडणार नाही जनता हिच आमचे सर्वस्व आहे.त्यामुळे निवडणूक आयोगाने काय निर्णय दिला त्यापेक्षा जनतेला काय वाटते हे महत्वाचे आहे.कस काय कस काय म्हणत माझ्याकडे आले माणूस बरा आहे म्हणून घेतल तुम्ही निवडून दिलात पण नसानसात गद्दारी भिनली आहे ते काय करणार आयुष्यात गद्दारीचा कलक मात्र फूसू शकणार नाहीत अशा शब्दात केसरकर यांच्यावर नाव न घेता टीका केली.

आम्ही हिंदुत्व सोडले म्हणून ओरड मारायची आणि धर्माधर्मात भांडणे लावून द्याची हे आमचे हिंदुत्व नसून हदयात राम आणि हाताला काम हे आमचे हिंदुत्व आहे असे यावेळी ठाकरे म्हणाले.भाजप विकास रथ फिरवून आपली विकास कामे सांगत आहेत पण याचे विकास रथ जनताच अडवून जाब विचारतेय यावरून तुम्ही काय विकास केलात हे जनतेला कळले आहे.असे सांगत भाजप ने केंद्रात राबवलेल्या योजनांचा ही ठाकरे यांनी समाचार घेतला तसेच यातील अनेक योजना काँग्रेस च्या आहेत फक्त नाव बदलली असे ठाकरे यावेळी म्हणाले.

राणेवर शेलक्या शब्दात टीका 

कोकण म्हणजे मी म्हणारयाना वैभव नाईक यांनी घरी बसवलय आता त्याचे काहि राहिले नाही.त्यामुळे घाबरून राहायचे नाही गुंडगिरी शिवसेनेने मोडीत काढली आहे.अशा शेलक्या शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा समाचार घेतला.

पंतप्रधान मालवणात आले आणि पाणबुडी घेऊन गेले

पंतप्रधान नरेंद्र मोदी नौसेना दिनानिमित्त मालवण येथे आले होते.या दौऱ्यात त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला काही दिले नाही पण मंजूर पाणबुडी गुजरातला घेऊन गेले असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Web Title: Uddhav Thackeray Slams Deepak Kesarkar and narayan rane in Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.