शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

उद्धवसेनेने स्वतःच्या ताकदीवर १० आमदार निवडून आणून दाखवावेत, नितेश राणे यांचे आव्हान

By सुधीर राणे | Updated: June 19, 2024 16:54 IST

राहुल गांधी यांना संविधान विषयी काही घेणे देणे नाही

कणकवली: मुंबई बॉम्बस्फोटानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात पाकिस्तानचे झेंडे कुठे दिसायचे नाहीत. मात्र, आज उद्धव ठाकरेंमुळे जागोजागी पाकिस्तानचे झेंडे दिसत आहेत. भाजपवर टीका करणाऱ्या उद्धवसेनेने हिंमत असेल तर कोणाचीही मदत न घेता स्वतःच्या ताकदीवर १० आमदार निवडून आणून दाखवावेत असे आव्हान आमदार नितेश राणे यांनी दिले. कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी राणे यांनी बुधवारी संवाद साधला.राणे म्हणाले, जर एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली नसती तर बाळासाहेबांचे नाव उद्धवसेनेच्या बॅनरवर कधीही दिसले नसते. संजय राऊत यांनी कितीही मिश्किल टोले मारु देत. मात्र, आता घोडा मैदान दूर नाही. देवेंद्र फडणवीस यांनी जे बोलून दाखवले आहे, ते सत्यात उतरविण्यासाठी आम्ही तयारी केलेली आहे. उद्धवसेनेची हिम्मत असेल तर काँग्रेस,शरद पवार यांची मदत ना घेता स्वतःच्या ताकदीवर १० आमदार निवडून आणून दाखवावेत. उद्धवसेना नावाच्या डुबत्या जहाजात कोण कशाला जाईल ? छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. ते एवढी मोठी चूक कधीच करणार नाहीत. आता ते अजित पवार यांच्यासोबत आहेत.त्यांना साथ देत आहेत.

राहुल गांधी यांना संविधान विषयी काही घेणे देणे नाहीमराठा ,ओबीसी किंवा इतर प्रत्येक समाजाला आपला अधिकार मागण्याचा हक्क आहे.मात्र हिंदूंमध्ये फाटाफूट होते त्याचा फायदा इतरांना होतो आहे, याचा विचार झाला पाहिजे. नाना पटोले यांच्या रूपाने काँग्रेसची संस्कृती समाजाला कळली आहे. आम्ही पण काँग्रेसमध्ये असताना बरेच काही बघितलेले आहे. ते केव्हा तरी महाराष्ट्राला सांगावे लागेल. हॉटेलमध्ये ह्यांचे नेते काय काय करतात याचे व्हीडिओ बाहेर आले तर तोंड दाखवायला जागा उरणार नाही. बाळासाहेबांच्या स्मारकाच्या परवानग्या देवेंद्र  फडणवीस यांनी दिल्या आहेत. मात्र उद्धव ठाकरे औरंगजेब, टिपू सुलतानचे स्मारक बांधतील. तर राहुल गांधी यांना संविधान विषयी काही घेणे देणे नाही असेही राणे म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेvidhan sabhaविधानसभा