शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
2
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
3
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
4
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
5
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
6
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
7
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
8
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
9
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
10
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
11
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
12
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
13
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
14
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
15
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
16
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
17
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
18
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
19
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
20
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती

कोकणात उद्धवसेनेला पुन्हा धक्का, खारेपाटण येथील पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 25, 2025 17:26 IST

संतोष पाटणकर खारेपाटण : उद्धवसेनेच्या खारेपाटण जिल्हा परिषद संपर्क प्रमुख सतीश गुरव, कणकवली युवा सेना उपतालुका प्रमुख तेजस राऊत ...

संतोष पाटणकरखारेपाटण : उद्धवसेनेच्या खारेपाटण जिल्हा परिषद संपर्क प्रमुख सतीश गुरव, कणकवली युवा सेना उपतालुका प्रमुख तेजस राऊत तसेच खारेपाटण उपविभागप्रमुख निखील गुरव यांनी आपल्या पदाचा व पक्ष सदस्यत्वाचा तडकाफडकी लेखी राजीनामा शिवसेना जिल्हाप्रमुख व युवा जिल्हाप्रमुख यांचेकडे सादर केला आहे. यामुळे खारेपाटण विभागात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान, खारेपाटण मध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या सामूहिक एकाच वेळी पक्ष श्रेष्ठीकडे देण्यात आलेल्या राजीनाम्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सद्या चिंतेचे वातावरण पसरले आहे. राजीनामे दिलेले पक्षाचे कट्टर कार्यकर्ते तथा पदाधिकारी आता कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

..त्यामुळे व्यथित अंतकरणाने राजीनामादरम्यान या राजीनामा पत्रात पदाधिकाऱ्यांनी आपली खंत व्यक्त केली आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निष्ठा ठेवून गेली अनेक वर्षे शिवसेना पक्षाचे आम्ही प्रामाणिक काम करत असून पक्षाने दिलेली जबाबदारी समर्थपणे संभाळून पक्षाने दिलेल्या पदाला न्याय देण्याचे काम केले आहे. तर ज्वलंत हिंदुत्व व समाजकारण हाच वारसा आम्हा शिवसैनिकांना बाळासाहेबांकडून मिळालेला आहे.

परंतु अलीकडच्या काळात उद्धवसेना पक्षाची वाटचाल ही हिंदुत्वापासून दूर होत चाललेली दिसत आहे. त्यामुळे व्यथित अंतकरणाने आम्ही आमच्या पदाचा व पक्ष सदस्यत्वचा राजीनामा देत असल्याचे राजीनामा पत्रात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना