शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

सावडाव मारहाण प्रकरणी उद्धवसेना आक्रमक; कणकवली पोलिस ठाण्यावर धडक, अधिकाऱ्याना विचारला जाब

By सुधीर राणे | Updated: April 15, 2025 11:39 IST

अन्यथा पोलिस ठाण्याच्या विरोधातच फलक लावण्याचा इशारा;  मारहाण करणाऱ्या संशयितांच्या तत्काळ अटकेची मागणी

कणकवली: सावडाव येथे रस्त्याच्या कामावरून एका महिलेला मारहाण करण्यात आली. हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. मारहाण करणाऱ्याना  पोलिसांचा आणि कायद्याचा धाक राहिलेला नाही. पोलिसांनी आरोपींना अद्याप अटक केलेली नाही. याउलट पोलिस ठाण्यात आलेल्या आरोपींना परस्पर विरोधी तक्रार करता यावी यासाठी रुग्णालयात पाठविल्याचा आरोप उध्दवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.    याप्रकरणी शिवसेना आंदोलनात्मक भूमिका घेणार आहे. पोलिस यंत्रणेकडून न्याय न मिळाल्यास, यापुढे असे प्रकार घडल्यास पोलिस ठाण्यात नागरिकांनी  जाऊ नये, असे प्रतिकात्मक फलक ठिकठिकाणी लावण्यात येतील असा इशारा उध्दवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी दिला. माजी आमदार वैभव नाईक, राजन तेली, सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, महिला आघाडीप्रमुख निलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिष्टमंडळाने पोलिस ठाण्यावर धडक देत निरीक्षक मारुती जगताप यांची  भेट घेतली. यावेळी तालुका प्रमुख कन्हैया पारकर, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, धीरज मेस्त्री, राजू राठोड यांच्यासह सावडाव ग्रामस्थ उपस्थित होते.सावडाव स्मशानभूमिकडे जाणाऱ्या रस्त्याच्या वादातून प्रमोद नरसाळे, वैभव सावंत व एक महिला यांना रविवारी सायंकाळी मारहाण करण्यात आली. तसेच विनयभंग करण्यात आला असल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केलेली नाही. उलट पोलिस ठाण्यात आलेल्या आरोपींना परस्पर विरोधी तक्रार करता यावी यासाठी रुग्णालयात पाठविल्याचा आरोप उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. तसेच या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही देण्यात आला.माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, प्रमोद नरसाळे यांची सावडाव स्मशान भूमीकडे रस्त्यावर जमीन आहे. त्या जमिनीत जेसीबीने खोदकाम करत असताना दत्ता काटे व अन्य व्यक्तींनी त्यांना खोदकाम करण्यास अटकाव केला तसेच मारहाण केली. त्यावेळी तेथे गेलेले सामाजिक कार्यकर्ते वैभव सावंत व एक महिला यांनाही गंभीर मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करण्याची गरज आहे. संशयित दत्ता काटे व त्याचे अन्य सहकारी यांनी वैभव सावंत व एक महिला यांना अमानुषपणे मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पोलिस संशयितांना पाठीशी घालत असल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला. ज्यावेळी संशयित पोलिस ठाण्यात आले होते त्यावेळी ते नशेत असल्याचा आरोप सुशांत नाईक यांनी केला. दरम्यान, ज्या जागेचा वाद आहे, ती जागा खासगी मालकीची आहे. तेथे यापुर्वी लावलेली काजू कलमे काढून टाकण्यात आली. गडगा पाडण्यात आला. आता जेसीबीने चर मारत असताना ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप जमिन मालक नरसाळे कुटुंबियांनी यावेळी केला. मारहाण झालेल्या महिलांनी आपली कैफियत पोलिसांसमोर मांडली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाPoliceपोलिस