शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

मालडी बंधाऱ्यासाठी वाढीव निधी देणार  :उदय सामंत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 12:31 IST

Uday Samant Sindhudurg-मालडी बंधार्‍याचे रद्द झालेले काम पुन्हा मंजूर करून घेण्यात आले. मालडी येथे साकारण्यात येणार्‍या कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍याचे काम चांगल्या दर्जाचे व्हायला हवे. या बंधार्‍याची उंची वाढविण्यासाठी अधिकचा निधी देण्याची जबाबदारी माझी असेल, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

ठळक मुद्देमालडी बंधाऱ्यासाठी वाढीव निधी देणार  :उदय सामंत  मालोंड-मालडी बंधाऱ्याच्या कामाचे वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

मालवण : मालडी बंधार्‍याचे रद्द झालेले काम पुन्हा मंजूर करून घेण्यात आले. मालडी येथे साकारण्यात येणार्‍या कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍याचे काम चांगल्या दर्जाचे व्हायला हवे. या बंधार्‍याची उंची वाढविण्यासाठी अधिकचा निधी देण्याची जबाबदारी माझी असेल, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.मालोंड-मालडी येथील कोल्हापूर बंधारा पाटबंधारे योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, बबन शिंदे, हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मंदार केणी, संग्राम प्रभुगावकर, छोटू ठाकूर, प्रसाद मोरजकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, नागेंद्र परब, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, संदीप हडकर, प्रांत वंदना खरमाळे, मालडी सरपंच संदीप आडवलकर, मालोंड सरपंच वैशाली घाडीगावकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.मालडी बंधार्‍याची उंची वाढविल्यास त्याचा पंचक्रोशीस लाभ होईल, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली. खासदार विनायक राऊत यांनी, या बंधार्‍याची उंची वाढविण्यासाठी प्रयत्न राहतील. वाढीव काम करण्याच्या दृष्टिकोनातून या बंधार्‍याचे काम केले जाईल. मालडीचा हा बंधारा पंचक्रोशीसाठी जीवनदायी ठरेल, असा विश्‍वास व्यक्त केला. मालडी बंधार्‍याचे काम मार्गी लावून मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलेल्या वचनाची पूर्ती केली आहे, असे आमदार नाईक यांनी सांगितले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतsindhudurgसिंधुदुर्ग