मालडी बंधाऱ्यासाठी वाढीव निधी देणार  :उदय सामंत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 12:30 PM2021-03-09T12:30:07+5:302021-03-09T12:31:44+5:30

Uday Samant Sindhudurg-मालडी बंधार्‍याचे रद्द झालेले काम पुन्हा मंजूर करून घेण्यात आले. मालडी येथे साकारण्यात येणार्‍या कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍याचे काम चांगल्या दर्जाचे व्हायला हवे. या बंधार्‍याची उंची वाढविण्यासाठी अधिकचा निधी देण्याची जबाबदारी माझी असेल, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

Uday Samant to provide additional funds for Maldi dam | मालडी बंधाऱ्यासाठी वाढीव निधी देणार  :उदय सामंत 

मालडी बंधाऱ्यासाठी वाढीव निधी देणार  :उदय सामंत 

googlenewsNext
ठळक मुद्देमालडी बंधाऱ्यासाठी वाढीव निधी देणार  :उदय सामंत  मालोंड-मालडी बंधाऱ्याच्या कामाचे वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

मालवण : मालडी बंधार्‍याचे रद्द झालेले काम पुन्हा मंजूर करून घेण्यात आले. मालडी येथे साकारण्यात येणार्‍या कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍याचे काम चांगल्या दर्जाचे व्हायला हवे. या बंधार्‍याची उंची वाढविण्यासाठी अधिकचा निधी देण्याची जबाबदारी माझी असेल, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

मालोंड-मालडी येथील कोल्हापूर बंधारा पाटबंधारे योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, बबन शिंदे, हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मंदार केणी, संग्राम प्रभुगावकर, छोटू ठाकूर, प्रसाद मोरजकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, नागेंद्र परब, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, संदीप हडकर, प्रांत वंदना खरमाळे, मालडी सरपंच संदीप आडवलकर, मालोंड सरपंच वैशाली घाडीगावकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

मालडी बंधार्‍याची उंची वाढविल्यास त्याचा पंचक्रोशीस लाभ होईल, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली. खासदार विनायक राऊत यांनी, या बंधार्‍याची उंची वाढविण्यासाठी प्रयत्न राहतील. वाढीव काम करण्याच्या दृष्टिकोनातून या बंधार्‍याचे काम केले जाईल. मालडीचा हा बंधारा पंचक्रोशीसाठी जीवनदायी ठरेल, असा विश्‍वास व्यक्त केला. मालडी बंधार्‍याचे काम मार्गी लावून मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलेल्या वचनाची पूर्ती केली आहे, असे आमदार नाईक यांनी सांगितले.

Web Title: Uday Samant to provide additional funds for Maldi dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.