शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

पालकांचा ग्रामपंचायतीत ठिय्या, हुमरमळा-वालावल येथील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 5:05 PM

हुमरमळा-वालावल बांधकोंड अंगणवाडी इमारतीचे बांधकाम रखडल्यामुळे पालकांनी मुले शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात ठाण मांडत तीव्र संताप व्यक्त केला. अंगणवाडीचे काम पूर्ण न झाल्यास सोमवारी याच इमारतीत मुलांना बसवून अंगणवाडीचा ताबा आपण घेणार असल्याचा इशारा यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी दिला.

ठळक मुद्देपालकांचा ग्रामपंचायतीत ठिय्या, हुमरमळा-वालावल येथील प्रकार अंगणवाडीचे काम सोमवारपर्यंत पूर्ण करण्याचा इशारा

कुडाळ : हुमरमळा-वालावल बांधकोंड अंगणवाडी इमारतीचे बांधकाम रखडल्यामुळे पालकांनी मुले शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात ठाण मांडत तीव्र संताप व्यक्त केला. अंगणवाडीचे काम पूर्ण न झाल्यास सोमवारी याच इमारतीत मुलांना बसवून अंगणवाडीचा ताबा आपण घेणार असल्याचा इशारा यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी दिला.हुमरमळा-वालावल बांधकोंड येथील अंगणवाडी इमारतीचे बांधकाम गेली तीन वर्षे रखडले आहे. त्यामुळे इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण न केल्यास मुले शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांनी ठिय्या केला.याबाबत ग्रामसेविका अपर्णा पाटील यांनी अतुल बंगे यांना कल्पना देताच बंगे यांनी उपसभापती जयभारत पालव आणि लघुपाटबंधारे विभागाचे अभियंता तोडणकर यांना घेऊन ग्रामपंचायत गाठली. मात्र, पालक आक्रमक झाले होते. यावेळी पालव यांनी अंगणवाडीचे काम रविवारपर्यंत खात्यामार्फत पूर्ण करा. ठेकेदारावर विश्वास ठेवू नका, अशा सूचना अभियंता तोडणकर यांना दिल्या.दरम्यान, उपसभापती जयभारत पालव याठिकाणी प्रथमच आल्याने सरपंच अर्चना बंगे आणि ग्रामसेविका पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शिवसेनेचे अतुल बंगे, युवासेना वालावल पंचायत समिती विभागप्रमुख मितेश वालावलकर, आशिष देसाई, शिवसेनेचे कृष्णा धुरी, संदेश चव्हाण, दत्ता गुंजकर, शैलेश मयेकर, अक्षय बंगे, अमित बंगे, भरत परब, रुपाली गुंजकर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.भूमिकेचे स्वागतदरम्यान, अंगणवाडीचे काम पूर्ण न झाल्यास सोमवारी या इमारतीत मुलांना बसवून अंगणवाडीचा ताबा घेणार असल्याचा इशारा बंगे यांनी दिला. तसेच पालकांशी चर्चा केली. उपसभापती पालव यांच्या भूमिकेचे पालकांनी स्वागत केले. सरपंच अर्चना बंगे यांनीही सोमवारपर्यंत इमारत ताब्यात न मिळाल्यास कोणतीही पूर्वकल्पना न देता निर्णय घेऊ, असा इशारा यावेळी दिला. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsindhudurgसिंधुदुर्ग