शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
2
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
3
बाबा 1 कोटी रुपये द्या, तरच...! 12 वर्षांच्या मुलीची सर्वोच्च न्यायालयात अजबच मागणी, CJI गवईंनी आईलाच सुनावलं!
4
एका खोलीतून सुरू झालेली कंपनी चीनसोबत करणार कोट्यावधी रुपयांचा व्यवसाय! शेअर्सने दिला १०००% परतावा
5
हैदराबादमध्ये शंभर वर्षे जुने मंदिर पाडण्यावरुन मोठा वाद; माधवी लतांना पोलिसांनी घेतले ताब्यात
6
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला नाही, त्यांना काढून टाकले; कुणी केली टीका?
7
७२ लाखांत घ्या लॅम्बोर्गिनीची मजा! देशातील पहिली इलेक्ट्रीक सुपर कार लाँच, १०० च्या स्पीडला...  
8
लष्कराच्या ताफ्यात नवं हत्यार! अचूक निशाणा अन् करेक्ट कार्यक्रम; ड्रोनने डागली मिसाईल, DRDO ला मोठं यश
9
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
10
"मला इलॉन मस्कची गरज," आरोप-प्रत्यारोपांनंतर आता अचानक का बॅकफूटवर आले डोनाल्ड ट्रम्प?
11
Video : माणुसकीला काळीमा! कॅन्सरग्रस्त आजीला नातेवाईकांनी रस्त्यावर सोडले; व्हिडीओ व्हायरल
12
१० लाख नवीन नोकऱ्या, १० कोटी घरांना ब्रॉडबँड...दूरसंचार धोरणा 2025 चा मसुदा जारी
13
“CM फडणवीसांना साफ-सफाईची मोहीम घ्यावी लागेल, ४ मंत्री जाणार”; संजय राऊतांनी नावेच सांगितली
14
मुंबईच्या चाळीत जन्म, १५ व्या वर्षी शाळा सुटली; आज कोट्यवधींच्या कंपनीचे मालक! कोण आहे ही व्यक्ती?
15
मेड इन इंडिया कारची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट झाली; हलक्यात न घेण्यासारखे स्टार घेऊन आली...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींना लंडनमध्ये चहा पाजणारा 'हा' युवक कोण?; भारताशी आहे खास कनेक्शन
17
Crime: गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाजवळच...; घटना ऐकून पायाखालची जमीन सरकेल!
18
श्रावणात सापांचा कहर, एकाच घरातून निघाले 60 विषारी नाग; गावात भीतीचे वातावरण
19
Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले
20
श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता

Sindhudurg: तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील दोन युवकांचा बुडून मृत्यू

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 22, 2025 15:27 IST

मालवण: पुणे हडपसर येथून तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेल्या दोन युवकांचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. रोहित बाळासाहेब ...

मालवण: पुणे हडपसर येथून तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेल्या दोन युवकांचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. रोहित बाळासाहेब कोळी (वय २१), शुभम सुनील सोनवणे (२२) अशी मृतांची नावे आहेत. तर कुश संतोष गदरे (२१), रोहन रामदास डोंबाळे (२०), ओंकार अशोक भोसले (२४) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  ही घटना आज, शनिवारी सकाळच्या सुमारास तारकर्ली एमटीडीसी जवळील समुद्रकिनाऱ्यावर घडली. हवेली तालुक्यातील कुश गदरे, रोहन डोंबाळे, ओंकार भोसले, रोहित कोळी, शुभम सोनवणे हे युवक मालवण तारकर्ली येथे पर्यटनासाठी आले होते. सकाळच्या सुमारास हे युवक समुद्र स्नानासाठी पाण्यात उतरले होते. यावेळी अचानक पाण्याच्या खोलीचा व लाटांचा अंदाज न आल्यामुळे पोहत असलेल्या युवकांपैकी ओंकार भोसले, रोहित कोळी, शुभम सोनवणे हे युवक पाण्यात ओढले गेले. किनारावरील स्थानिकांनी तसेच पर्यटन व्यवसायिकांनी तात्काळ बचाव कार्य सुरू केले. बोटीच्या सहाय्याने बुडालेल्या युवकांचा पाण्यात शोध कार्य सुरू करण्यात आले. अखेर स्थानिकांकडून समुद्राच्या पाण्यात शोधकार्य सुरू असताना बुडालेल्या अवस्थेत तीनही युवक सापडून आले. त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान डॉक्टर आणि तपासणी केली असता रोहित कोळी व शुभम सोनवणे यांना मयत घोषित केले. ओंकार भोसले हा अत्यवस्थ असून त्याच्यावर अधिक उपचारासाठी त्याला खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. बचाव कार्यात समीर गोवेकर, वैभव सावंत, दत्तराज चव्हाण, महेंद्र चव्हाण, रांजेश्वर वॉटर स्पोर्टचे कर्मचारी सामील होते. याप्रकरणी मालवण पोलिस तपास करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPuneपुणेdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू