शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कुणकेश्वर यात्रेसाठी निघाले असता काळाचा घाला, कारच्या धडकेत एक जण जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 15:52 IST

शिरगाव: कुणकेश्वर यात्रेसाठी काका-पुतणे  दुचाकीवरुन निघाले असता कारने दिलेल्या धडकेत काकाचा जागीच मृत्यू झाला. तर पुतण्या गंभीर जखमी झाला. ...

शिरगाव: कुणकेश्वर यात्रेसाठी काका-पुतणे  दुचाकीवरुन निघाले असता कारने दिलेल्या धडकेत काकाचा जागीच मृत्यू झाला. तर पुतण्या गंभीर जखमी झाला. सुधीर पांडुरंग लब्दे (वय-४७) असे मृताचे नाव आहे. तर, अमोल संजय लब्दे (२४) असे जखमीचे नाव आहे. वरेरी मसरण येथे काल, मंगळवारी (दि.१) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.याबाबत अधिक माहिती अशी की, देवगड तालुक्यातील शिरगाव आंबेखोल येथील अमोल लब्दे हा दुचाकीवरून काका सुधीर लब्दे यांना घेऊन शिरगावहून कुणकेश्वर यात्रेसाठी निघाला होता. दरम्यान कुणकेश्वरहून कणकवलीच्या दिशेने निघालेल्या कारची वरेरी मसरण येथे त्यांच्या दुचाकीला समोरुन धडक झाली.यात सुधीर लब्दे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अमोल लब्दे हा गंभीर जखमी झाल्याने त्याला अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले. शिरगाव येथे सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे  नुकसान झाले.शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. अपघाताची फिर्याद संतोष लब्दे यांनी देवगड पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अधिक तपास देवगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद डगरे, राजन जाधव, आशिष कदम, विशाल वैजल करीत आहेत.रस्त्याची साईडपट्टी अपघाताला कारणीभूतलिंगडाळ तिठा येथून कुणकेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावर वरेरी मसरण दरम्यान रस्त्याची एका बाजूने कडा तुटलेली आहे. त्यामुळे रस्ता आणि साईडपट्टी यामध्ये अंतर निर्माण झाले आहे. हेच रस्ता आणि साईड पट्टी यांच्यामधील अंतर लहान वाहनांसाठी धोकादायक ठरत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने यात्रेपूर्वी लक्ष देणे आवश्यक होते अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांतून उमटत होत्या.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात