शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

दोन शाळकरी मुलींचा मृत्यू, दोघांचे वेगवेगळे आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 14:10 IST

कलंबिस्त येथील दोन शाळकरी मुलींचा मागील २४ तासांत वेगवेगळ््या आजारपणात मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. यात गुरूवारी श्रावणी संतोष सावंत हिचा तर शुक्रवारी रिक्षिता दिनेश पास्ते हिचा मृत्यू झाला. रिक्षिताच्या मृत्यूनंतर आज मिलाग्रीस शाळा बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ​​​​​​​

ठळक मुद्देदोन शाळकरी मुलींचा मृत्यू, दोघांचे वेगवेगळे आजार घटनेने कलंबिस्त परिसरात हळहळ

सावंतवाडी : कलंबिस्त येथील दोन शाळकरी मुलींचा मागील २४ तासांत वेगवेगळ््या आजारपणात मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. यात गुरूवारी श्रावणी संतोष सावंत हिचा तर शुक्रवारी रिक्षिता दिनेश पास्ते हिचा मृत्यू झाला. रिक्षिताच्या मृत्यूनंतर आज मिलाग्रीस शाळा बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.श्रावणी सावंत ही गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. तिच्यावर पुणे येथील मिलट्री रूग्णालयात औषधोपचार सुरू होते. त्यातूनही ती बरी होऊन शाळेत येत होती. मात्र, अचानक चार दिवसांपासून पुन्हा तिची तब्येत बिघडली आणि बांबोळी-गोवा येथे तिचा मृत्यू झाला. श्रावणी ही कळसुकलर हायस्कूलची विद्यार्थिनी होती. ती अभ्यासातही हुशार होती. गुरूवारी तिच्या मृत्यूची बातमी कळताच कळसुलकर हायस्कूल बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.ही घटना ताजी असतानाच कलंबिस्त येथील रिक्षिता दिनेश पास्ते हिचा बांबोळी-गोवा येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. ती मिलाग्रीस हायस्कूलमध्ये नववीमध्ये शिकत होती. तिला काही दिवसांपूर्वी बे्रन ट्युमर झाला होता. तिच्यावर बांबोळी-गोवा येथे उपचारही सुरू होते. त्यातच तिचे आज निधन झाले. रिक्षिताच्या निधनाची बातमी मिळताच मिलाग्रीसमधील तिच्या मैत्रिणींना शोक अनावर झाला होता. या घटनेनंतर मिलाग्रीस शाळा बंद ठेवून रिक्षिताला श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली.रितिक्षाचे वडील येथील सावंतवाडी अर्बन बँकेत कार्यरत असून हे कुटुंब पूर्वीपासून सावंतवाडीतच राहते. गेल्या २४ तासांत कलंबिस्तमधील दोन शाळकरी मुलींना वेगवेगळ््या आजारपणात आपला प्राण ग्रमवावा लागल्याने गावातही हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Healthआरोग्यsindhudurgसिंधुदुर्ग