शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

दोन राज्यमंत्री आमने-सामने

By admin | Updated: November 13, 2016 23:32 IST

सावंतवाडी नगरपालिका निवडणूक : केसरकर, चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला

अनंत जाधव ल्ल सावंतवाडी राज्याच्या मंत्रिमंडळातील महायुतीतीलच दोन राज्यमंत्री सध्या सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने ऐकामेकांसमोर उभे ठाकले आहेत. यात शिवसेनेचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, तर भाजपचे बंदर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचा समावेश आहे. सावंतवाडी हा मंत्री केसरकरांचा बालेकिल्ला असल्याने भाजपने नगरपालिका निवडणूक प्रतिष्ठेची बनवली असून, राज्याचे लक्ष सावंतवाडीवर लागून राहिले आहे. केंद्रात व राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण व देवगड येथे नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना- भाजपमध्ये युती झाली. पण सावंतवाडी व वेंगुर्ले नगरपालिकेत युती झाली नसून, काही ठिकाणी आघाडीमध्ये कुरबुरी असल्याने तिरंगी व चौरंगी लढती होत आहेत. निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात शिवसेना-भाजपचे स्थानिक नेते युतीवरून आमने-सामने आले होते. मात्र, शेवटच्या टप्प्यात युती तुटल्याने दोन्ही पक्ष ऐकामेकांच्या विरोधात लढणार आहेत. यापूर्वी दीपक केसरकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना शिवसेना तसेच भाजपबरोबर महायुती करून निवडणूक लढवित होते व एकहाती सत्ता आणत होते. त्यावेळी त्यांचा प्रतिस्पर्धी पक्ष एकमेव काँग्रेस होता. मात्र, दोन वर्षांपूर्वी दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केल्याने सावंतवाडी शहरात शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. सावंतवाडीतील केसरकर समर्थक १७ पैकी १६ नगसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे शहरात शिवसेनेचे संख्याबळ चांगल्यापैकी वाढले आहे. त्यामुळे युतीच्या बोलणीत संख्याबळात शिवसेनेने भाजपला अवघ्या दोन ते तीन जागा देण्याचे निश्चित केले होते. पण, भाजपने शिवसेनेची आॅफर नाकारत स्वबळाचा नारा दिल्याने पालिका निवडणुकीतील चुरस आणखी वाढली आहे. त्यातच भाजपने संपूर्ण कोकणची जबाबदारी ही बंदर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या खांद्यावर दिली असून, ते गेले आठवडाभर सावंतवाडीतच तळ ठोकून बसले आहेत. त्यांनी भाजप शहरात अल्प आहे, हा कार्यकर्त्यांच्या मनातील न्यूनगंड काढून टाकत पहिल्या टप्प्यातच नगराध्यक्षासह नगरसेवकपदासाठी उमेदवार उभे करीत शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. त्यामुळे सावंतवाडीत गेली अनेक वर्षे होणारी दुरंगी लढत आता तिरंगी लढत झाली असून, त्यात अनेकांना लॉटरी लागू शकते. तर काहींचा पत्ता कटही होऊ शकतो. तरीही युतीचे नेते आम्ही मैत्रिपूर्ण लढत लढणार, असे सांगत आहेत. पालिकेत शिवसेना सत्ताधारी असल्याने भाजपने शिवसेनेच्या विरोधातच जोरदार आघाडी उघडल्याने मैत्रिपूर्ण लढत शेवटच्या काही दिवसांत विरोधकांमध्ये परावर्तीत होण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे दोन्हीकडच्या नेत्यांना आतापासूनच सबुरीने घ्यावे लागणार आहे. कल्याण-डोंबिवलीचा अनुभव गाठीशी भाजपने सावंतवाडीची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर दिली आहे, ते बंदर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजपला ६ वरून ४४ जुदाई आकडा गाठून दिल्याने त्यांचे राज्यात वजन वाढले आहे. भाजपला सावंतवाडीचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यातून घेऊन दिल्यास चव्हाण हेच किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. त्यांना माजी आमदार राजन तेली, युवा नेते संदेश पारकर यांचीही साथ लाभत आहे.