पूर्वांचलातील रेल्वेसाठी दोन लाख कोटी : प्रभू

By Admin | Updated: January 11, 2015 00:25 IST2015-01-11T00:24:32+5:302015-01-11T00:25:51+5:30

मालवणात सत्कार : आठ राज्यांचे मार्चपासून सर्वेक्षण

Two lakh crores for the Eastern Railway: Prabhu | पूर्वांचलातील रेल्वेसाठी दोन लाख कोटी : प्रभू

पूर्वांचलातील रेल्वेसाठी दोन लाख कोटी : प्रभू

मालवण : पूर्वांचलमधील आठ राज्यांमध्ये अद्यापही रेल्वे पोहोचलेली नाही. चीनच्या सीमेलगत असलेल्या या भागात रेल्वेचे जाळे वाढविण्यासाठी दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केंद्र सरकार करणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज, शनिवारी केली. मार्च-एप्रिलमध्ये संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासोबत सीमेलगतच्या राज्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
मालवण येथे झालेल्या नागरी सत्कारप्रसंगी ते बोलत होते. येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे मालवणचे सुपुत्र सुरेश प्रभू यांचा मालवणवासीयांतर्फे नागरी सत्कार करण्यात आला.
सुरेश प्रभू पुढे म्हणाले, अर्थव्यवस्था बदलायची असेल तर देशात सामाजिक, राजकीय बदलांबरोबरच पायाभूत सुविधाही वाढल्या पाहिजेत.
देशाचा विकासदर वाढण्यामध्ये कनेक्टीव्हिटी महत्त्वाची आहे. रेल्वेमुळे देशाचे अर्थकारण बदलू शकते. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास आहे. त्यामुळे पूर्वांचलांमधील राज्यात रेल्वेचे जाळे विणण्यासाठी केंद्राने २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे ठरविले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Two lakh crores for the Eastern Railway: Prabhu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.