शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गावर तेर्सेबांबर्डे अपघातात दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 15:34 IST

मुंबई-गोवा महामार्गावर तेर्सेबांबर्डे येथे गुरुप्रसाद हॉटेलसमोर चारचाकी गाडी व मालवाहू ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात चारचाकी चालक जितेंद्र दळवी (४०) व क्लिनर किरण वोगटे (१९, रा. चिपळूण) हे दोघे जागीच ठार झाले. हा अपघात बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास झाला.

ठळक मुद्देमुंबई-गोवा महामार्गावर तेर्सेबांबर्डे अपघातात दोघे ठारचारचाकीने थांबलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर तेर्सेबांबर्डे येथे गुरुप्रसाद हॉटेलसमोर चारचाकी गाडी व मालवाहू ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात चारचाकी चालक जितेंद्र दळवी (४०) व क्लिनर किरण वोगटे (१९, रा. चिपळूण) हे दोघे जागीच ठार झाले. हा अपघात बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास झाला.कोल्हापूरहून गोव्याच्या दिशेने स्टीलची वाहतूक करणारा ट्रक शंकर बोकडेकर हे घेऊन जात होते. तेर्सेबांबर्डे येथील गुरुप्रसाद हॉटेलसमोरील महामार्गावर टायर पंक्चर झाल्याने हा ट्रक थांबला होता. दरम्यान, रत्नागिरीहून गोव्याकडे भरधाव वेगात जाणाऱ्या चारचाकीने या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली.या धडकेत चारचाकीचा दर्शनी भाग ट्रकच्या मागील भागात घुसल्याने त्याचा चक्काचूर झाला. ट्रकमध्ये ठेवलेले स्टील चारचाकीच्या केबिनमध्ये घुसल्याने चालक व क्लिनर यांचा जागीच मृत्यू झाला.कुडाळ पोलीस निरीक्षक शंकर कोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र्र हुलावळे व सिंधुदुर्ग जिल्हा महामार्ग वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक उमाकांत पालव, हेडकॉन्स्टेबल मिठबांवकर, प्रदीप पुजारे, पोलीस नाईक पाडावे व कॉन्स्टेबल चव्हाण नाईक यांनी घटनेचा पंचनामा केला.चारचाकी गाडीत अडकलेल्या या दोघांचे मृतदेह क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. त्यांच्याकडील मोबाईलमधील नंबरवरून त्यांच्या नातेवाईकांशी पोलिसांनी संपर्क साधल्यानंतर त्यांची ओळख पटली. सायंकाळी उशिरा मृतांचे नातेवाईक कुडाळ येथे दाखल झाले होते. 

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग