शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मत्स्य आयुक्तांसह दोघे जाळ्यात, लाचलुचपत विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 11:33 IST

मालवण : समुद्रात अवैधरित्या मासेमारी करताना पकडलेल्या पर्ससीन नौकेवर कारवाई न करण्यासाठी एका मच्छिमार व्यावसायिकाकडे पाच लाख रुपयांची लाच ...

ठळक मुद्देमत्स्य आयुक्तांसह दोघे जाळ्यात, लाचलुचपत विभागाची कारवाई दोन लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

मालवण : समुद्रात अवैधरित्या मासेमारी करताना पकडलेल्या पर्ससीन नौकेवर कारवाई न करण्यासाठी एका मच्छिमार व्यावसायिकाकडे पाच लाख रुपयांची लाच मागून त्याचा दोन लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त व परवाना अधिकारी शिवराज चव्हाण या दोघांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

रात्री उशिरा त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.  त्यामुळे मत्स्यव्यवसाय विभागात एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री मत्स्य व्यवसाय विभागाच्यावतीने समुद्रात गस्त घालत असताना एक स्थानिक मच्छिमारांची पर्ससीन नौका पकडण्यात आली. हा ट्रॉलर जप्त करण्यात येईल, अशी भीती घालत या नौकेबरोबर अन्य एका नौकेवर कारवाई न करण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी मत्स्य व्यवसायच्या अधिकाऱ्यांनी केली. ही रक्कम दिल्यास मे महिन्यापर्यंत तुमच्यावर कोणतीही कारवाई करणार नसल्याचेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ही रक्कम तीन टप्प्यात द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. ही मागणी संबंधित मच्छिमाराने मान्य केली. याबाबतची तक्रार त्या मच्छिमार व्यावसायिकाने लाचलुचपत विभागाकडे दिली. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचला.

शनिवारी सायंकाळी सहायक मत्स्य व्यवसाय कार्यालयात सायंकाळी ५ वाजता संबंधित मच्छिमार व्यावसायिक पहिल्या हप्त्यातील दोन लाख रुपयांची लाच देण्यास गेला असता ही रक्कम स्वीकारताना सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त, परवाना अधिकारी शिवराज चव्हाण या दोघांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने धाड टाकत रंगेहाथ पकडले.या कारवाईत लाचलुचपत पोलीस उपअधीक्षक दीपक कांबळे, पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, पोलीस हवालदार प्रथमेश पोतनीस, जनार्दन रेवंडकर, पोलीस नाईक अजित खंडे, रवींद्र पालकर सहभागी होते. रात्री उशिरापर्यंत पंचनाम्याची तसेच अटकेची कार्यवाही सुरू होती. उद्या, रविवारी या दोन्ही संशयित आरोपींना जिल्हा विशेष न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.मत्स्य व्यवसाय विभागाचा कारभार चव्हाट्यावररात्री उशिरापर्यंत पंचनाम्याची तसेच अटकेची कार्यवाही सुरू होती. रविवारी या दोन्ही संशयित आरोपींना जिल्हा विशेष न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त हे किनारपट्टीवरील तिन्ही तालुक्यांचा कारभार पाहतात. त्यांच्यावर तसेच नव्यानेच भरती झालेल्या परवाना अधिकारी शिवराज चव्हाण या दोन अधिकाऱ्यांवर लाच मागितल्याप्रकरणी कारवाई झाल्याने मत्स्यव्यवसाय विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणsindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारी