शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

कोकण रेल्वे मार्गावर दोन फेस्टिव्हल स्पेशल गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 5:53 PM

konkanrailway, kankavli, festivaltrain, sindhudurgnews कोकण रेल्वे मार्गावर दोन फेस्टिव्हल स्पेशल गाड्या धावणार आहेत. नागपूर-मडगाव तसेच पुणे-मडगाव या दोन गाड्यांचा यामध्ये समावेश आहे. २३ ऑक्टोबरपासून या गाड्या सुरू होणार आहेत. अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ठळक मुद्देकोकण रेल्वे मार्गावर दोन फेस्टिव्हल स्पेशल गाड्या२३ ऑक्टोबरपासून या गाड्या सुरू होणार

कणकवली : कोकण रेल्वे मार्गावर दोन फेस्टिव्हल स्पेशल गाड्या धावणार आहेत. नागपूर-मडगाव तसेच पुणे-मडगाव या दोन गाड्यांचा यामध्ये समावेश आहे. २३ ऑक्टोबरपासून या गाड्या सुरू होणार आहेत. अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्यांच्या सोयीसाठी या दोन विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. यातील नागपूर - मडगाव मार्गावरील विशेष गाडी (०१२३५/०१२३६) नागपूर स्थानकावरून २३ व ३० ऑक्टोबर, तसेच ६ नोव्हेंबर २०२० या तारखांना सायंकाळी ४ वाजता सुटणार असून दुसऱ्या दिवशी ती गोव्यात मडगावला सायंकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी पोहोचणार आहे.परतीच्या प्रवासात ही गाडी मडगावहून २४, ३१ ऑक्टोबर तसेच ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि नागपूरला ती दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजून ३०मिनिटांनी पोहोचेल. वातानुकूलित, स्लीपर, सेकंड सीटींग दर्जाच्या २२ डब्यांची ही गाडी पूर्णपणे आरक्षित असेल. ही गाडी वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, नाशिक, इतगपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थीवी व करमाळी स्थानकांवर थांबे घेईल.दुसरी फेस्टिव्हल स्पेशल गाडी (०१४०९/०१४१०)पुणे - मडगाव मार्गावर धावणार आहे. ही गाडी पुण्याहून २३,३० ऑक्टोबर तसेच ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी सुटणार असून लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थीवी तसेच करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे. गाडी वातानुकूलित, स्लीपर, सेकंड सीटींग दर्जाच्या २२ डब्यांची पूर्णपणे आरक्षित असेल. शासनाच्या नियमावलीचे पालन करून या गाड्या धावणार आहेत.

 

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग