‘त्यां’चा चतुष्कोनी प्रवास प्रेरणादायी
By Admin | Updated: November 28, 2014 23:56 IST2014-11-28T21:33:20+5:302014-11-28T23:56:18+5:30
१०,४८२ किलोमीटर प्रवास: निर्भय जीवन जगण्याचा चौधरी यांचा संदेश

‘त्यां’चा चतुष्कोनी प्रवास प्रेरणादायी
रत्नागिरी : कोणत्याही धाडसाला वयाचीङ्कमर्यादा नसते म्हणतात ते खरच आहे. जळगाव येथील डॉ. सुनीलदत्त चौधरी यांच्याकडे पाहिले की, त्याची प्रचिती येते. एखाद्या तरुणाला लाजवेल, अशी ऊर्जा वयाच्या ५३व्या वर्षीही असलेले डॉ. चौधरी यांनी देशाच्या चतुष्कोेनाला स्पर्श करण्याचे अभियान हाती घेतले आहे. ३० आॅक्टोबर रोजी कन्याकुमारीपासून या अभियानाला सुरुवात झाली असून, आतापर्यंत त्यांनी १० हजार ४८२ किलोमीटर्सचा प्रवास पूर्ण केला आहे.
ङ्कजळगाव जिल्ह्यातील या भारतीय नागरिकाने यापूर्वीच कन्याकुमारी ते लेह हा प्रवास पूर्ण करून पाच वर्षांपूर्वीच ‘लिम्का बुक आॅफङ्खवर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद केली आहे. त्यांनी तीन हजार ८४७ किलोमीटर्सचा प्रवास अवघ्या सहा दिवस पाच तास आणि २५ मिनिटांमध्ये पूर्ण केला. २२ मे २००९ रोजी कन्याकुमारी येथून सुरू केलेला हा प्रवास २८ मे २००९ रोजी लेह येथे संपला.
देशाच्या चारही कोपऱ्यांना स्पर्श करण्याच्या अभियानांतर्गत डॉ. चौधरी हे रत्नागिरीत आले आहेत. या अभियानासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या आणि मान्यतापत्र घेऊनच हा प्रवास करीत असल्याचे त्यांनी सांगितले. कोणतेही धाडसी पाऊल टाकण्यासाठी मनात भीती बाळगू नका, आपले जीवन मनसोक्त जगा, असा संदेश याङ्कमाध्यमातून जगाला देत असल्याचे चौधरी यांनी सांगितले.
वेगवेगळ्या अभियानाच्या ङ्कमाध्यमातून आतापर्यंत चार लाख किलोमीटर्सचा प्रवास केला आहे. आपला मुलगा रामकृष्ण याचे स्वप्न साकार करत आहे. देशाच्या चारही कोपऱ्यांना स्पर्श करून पुन्हा एकदा ‘लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नाव नोंदविण्याचा मनोदय डॉ. चौधरी यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)