शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: तिलारी खोऱ्यात टस्कर परतला; शेतकऱ्यांची वाढली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 11:54 IST

भाताची उडवी फस्त करण्याच्या भीतीने धास्ती

दोडामार्ग : गेल्या दोन महिन्यांपासून अज्ञातवासात गेलेल्या हत्तीच्या कळपातील टस्कर पुन्हा परतल्याने तिलारी खोऱ्यातील शेतकऱ्यांची पाचावर धारण बसली आहे. त्याच्याकडून भाताची उडवी फस्त केली जाण्याच्या भीतीने बळीराजा धास्तावला आहे.हत्तींचा तिलारी खोऱ्यात मागील वीस ते बावीस वर्षांपासून वावर आहे. पावसाळ्यात हे हत्ती या खोऱ्यातून निघून जातात. परिणामी, भयमुक्त झालेले शेतकरी भात, नाचणी पिकांची शेती करतात. पावसाळा संपल्यावर शेतकरी शेतीची कापणी करून त्यांची उडवी लावतो. त्यानंतर शेतात चवळी, मिरची व इतर प्रकारच्या भाज्यांची झाडे लावली जातात.मात्र, पावसाळा संपतो न संपतो तोच गेलेले हत्ती या हंगामात तिलारी खोऱ्यात पुन्हा परततात व शेतकऱ्यांच्या शेतीचे अतोनात नुकसान करतात, तसेच काही वेळा हे हत्ती थेट अन्नाच्या शोधात लोकवस्तीतही घुसतात. यावेळी मात्र ग्रामस्थांची भीतीने पळता भुई थोडी होते.

शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

यंदादेखील तिलारी खोऱ्यातील हत्ती पावसाळ्यात गेले होते. मात्र, चार दिवसांपूर्वीच घाटीवडे, बांबर्डे परिसरात एका टस्कराचे आगमन झाले. त्यानंतर या टस्कराचे लोकवस्ती जवळ दर्शन झाले. टस्कराने येताच क्षणी केळी उद्ध्वस्त केल्या. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हत्तींना वेळीच रोखण्याची शेतकऱ्यांची मागणीतसेच यंदा कापणी केलेल्या भातपिकांची अद्यापपर्यंत मळणी झालेली नसल्याने हे पिक टस्कर फस्त तर करणार नाही ना? या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. सद्य:स्थितीत एकच टस्कर आला असला तरी त्याच्या मागोमाग इतर हत्तींचा कळप येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या हत्तींना वेळीच रोखण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग