खारेपाटण चेक पोस्ट येथे अवैधरित्या खैर लाकूड वाहतूक करणारा ट्रक पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2021 02:23 PM2021-12-09T14:23:07+5:302021-12-09T14:23:50+5:30

खैर लाकूड वाहतूक करताना देण्यात आलेल्या पास मध्ये तफावत आढळून आली. पास मंजूर केलेला शिक्का मालावर आढळून आला नाही.

A truck transporting illegal timber was seized at Kharepatan check post | खारेपाटण चेक पोस्ट येथे अवैधरित्या खैर लाकूड वाहतूक करणारा ट्रक पकडला

खारेपाटण चेक पोस्ट येथे अवैधरित्या खैर लाकूड वाहतूक करणारा ट्रक पकडला

googlenewsNext

खारेपाटण : अवैधरित्या खैर लाकूड वाहतूक करणारा ट्रक खारेपाटण चेक पोस्टवर पकडण्यात आला. पहाटे ६.३० च्या सुमारास वन क्षेत्र अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. रत्नागिरी लांजा येथून सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथे चाललेला (एम.एच १०-झेड ०५६०) हा ट्रक शेडीव, किटा, खैर लाकूड अवैधरित्या घेऊन जाताना ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी वाहन चालक विलास विठ्ठ डोंगरे (रा. देवरुख) व मालक राजेश कोलपटे (रा. लांजा) यांच्यावर अवैध वाहतूक केल्याप्रकरणी व पास मध्ये दाखवलेल्या माला पेक्षा अधिक सुमारे १५ते १६ घन मीटर माल गाडीत आढळून आल्याने कारवाई करण्यात आली.

वन परिक्षेत्र कार्यालय कणकवली यांच्यावतीने  करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान कणकवली वनक्षेत्रपाल अधिकारी आर एफ ओ घुनळीकर,वनपरिमंडल अधिकारी अनिल जाधव, तारिक फकीर, सत्यवान सुतार, वनरक्षक संजीव जाधव, विश्वनाथ माळी, अनिल राख, अतुल खोत, अतुल सुतार, एम पी शेगावे, श्रीम चंद्रिका लोहार, शिर्के आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पास मंजूर केलेला शिक्का मालावर नाही

खारेपाटण चेक पोस्ट येथे आज करण्यात आलेल्या कारवाईत सदर खैर लाकूड वाहतूक करताना देण्यात आलेल्या पास मध्ये तफावत आढळून आली. पास मंजूर केलेला शिक्का मालावर आढळून आला नाही. त्यामुळे सदर खैर लाकूड वाहतूक करणारा ट्रक वन विभागाने आपल्या ताब्यात घेतला. पुढील अधिक चौकशीसाठी हा ट्रक फोंडा विक्री आगार वनपरिमंडळ अधिकारी फोंडा कार्यालय येथे पाठविण्यात आला असल्याची माहिती राजेंद्र घुनळीकर वनक्षेत्रपाल अधिकारी कणकवली यांनी दिली.

Web Title: A truck transporting illegal timber was seized at Kharepatan check post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.