शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: हळवल येथे तिहेरी अपघात; सुदैवानं जिवीतहानी टळली

By सुधीर राणे | Updated: April 3, 2024 16:27 IST

रस्त्याकडेला उभ्या असलेल्या डंपरला पाठिमागून दुसऱ्या डंपरची धडक

कणकवली : तालुक्यातील हळवल येथून शिरवलकडे जाणाऱ्या मार्गावर तीन वाहनांमध्ये धडक होवून अपघात झाला. रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या डंपरला मागून येणाऱ्या दुसऱ्या डंपरची धडक बसली. तर त्या डंपरची धडक दुचाकीला बसल्याने मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. अपघाताची तीव्रता एवढी भयानक होती की, धडक देणाऱ्या डंपरचे दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. हा अपघात बुधवारी सकाळच्या सुमारास झाला.हळवल- कळसुली-शिरवल मार्गावर मोठ्या प्रमाणात खडी वाहतूक करणाऱ्या डंपरची वर्दळ असते. यापूर्वीही काहीवेळा या ठिकाणी ओव्हरलोड खडी वाहतूक करणाऱ्या डंपरचे अपघात झालेले आहेत. सोमवारी सकाळी हळवल येथील  गिरण नजीकच्या तीव्र उतारावर डंपर (क्रमांक एम.एच.०७ ए.जे. ९०४५) चा चालक तेथे मूळ मालकाकडून पास घेण्यासाठी थांबला होता. तर त्या डंपर मालकाने डंपर समोरच आपली दुचाकी उभी केली होती.  रस्त्याच्या बाजूला थांबून ते बोलत होते. दरम्यान, शिरवल येथून कणकवलीच्या दिशेने खडी वाहतूक करणारा डंपर ( क्रमांक एम.एच.०७ सी ५१९९) जात होता. उभ्या असलेल्या डंपरला ओव्हरटेक करून जात असताना समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देण्यासाठी त्या चालकाने आपल्या ताब्यातील डंपर कणकवलीच्या दिशेने जाताना डाव्या बाजूला घेतला. मात्र डंपर मध्ये ओव्हरलोड खडी असल्याने त्या तीव्र उतारावर डंपरवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. हा अपघात एवढा तीव्र होता की, या अपघातात डंपर (क्रमांक एम.एच. ०७ सी -५१९९) च्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. तर डंपर चालक हा डंपरमध्येच अडकून पडला होता. चालकाच्या छातीला किरकोळ स्वरूपाची दुखापत झाली. तर धडक दिलेल्या डंपरचे मागील बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात दुचाकी डंपरखाली चिरडली गेली. अपघाताची माहिती मिळताच हळवल मधील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मागील डंपर मध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हळवल -शिरवल- कळसुली या मार्गावरून मोठ्या प्रमाणात खडी वाहतूक केली जाते. यासाठी वापरले जाणारे डंपर हे भरधाव वेगाने जात असल्याने या ठिकाणी वारंवार छोटे – मोठे अपघात होत असतात. त्यामुळे या रहदारीच्या रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरना वेळीच आवर घालावा, अशा मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात