शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

झाड कोसळले, वैभववाडी-उंबर्डे मार्ग तासभर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 16:10 IST

वैभववाडी-उंबर्डे मार्गावर कुसूर पिंपळवाडी येथे गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास झाड कोसळले. त्यामुळे तासभर वाहतूक ठप्प झाल्याने विद्यार्थी व कर्मचारी अडकून पडले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जेसीबीने झाड हटवून वाहतूक सुरळीत केली.

ठळक मुद्देझाड कोसळले, वैभववाडी-उंबर्डे मार्ग तासभर बंद स्थानिक ग्रामस्थ, प्रवासी व बांधकाम विभागाने वाहतूक केली सुरळीत

वैभववाडी : वैभववाडी-उंबर्डे मार्गावर कुसूर पिंपळवाडी येथे गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास झाड कोसळले. त्यामुळे तासभर वाहतूक ठप्प झाल्याने विद्यार्थी व कर्मचारी अडकून पडले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जेसीबीने झाड हटवून वाहतूक सुरळीत केली.पिंपळवाडी थांब्याच्या अलीकडे हे झाड कोसळले होते. त्यामुळे उंबर्डे, भुईबावडा परिसरातून वैभववाडीत येणारे विद्यार्थी तसेच वैभववाडीतून त्या भागात जाणारे शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, बँक कर्मचारी अडकून पडले होते. तहसील कार्यालयातील दूरध्वनी कोणीच उचलत नसल्याने अखेर प्रवाशांनी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे संपर्क साधला.त्यानंतर आपत्कालीन यंत्रणेची वाट पाहून स्थानिक ग्रामस्थ, प्रवाशांनी रस्त्यावरील झाडाच्या काही फांद्या तोडून दुचाकींच्या एकेरी वाहतुकीपुरता मार्ग खुला केला. त्यानंतर बांधकाम विभागाच्या जेसीबीने झाड हटवून मार्गावरील तासभर खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, वैभववाडी तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला असून पूरस्थिती ओसरली आहे. मात्र, सातत्याने पडणाऱ्या पावसाने सर्वत्र दलदल झाली आहे. त्यामुळे वारा असल्यास झाडे पडण्याच्या घटना घडत आहेत.आपत्ती कक्षाच्या दूरध्वनीला प्रतिसाद मिळेनानैसर्गिक आपत्ती काळात तातडीने उपाययोजना राबविण्यासाठी वैभववाडी तहसील कार्यालयात स्थापन केलेला आपत्ती व्यवस्थापन कक्ष नामधारी ठरत आहे. गुरुवारी सकाळी त्याचा प्रत्यय आला. कुसूर पिंपळवाडी येथे सकाळी ८.३० च्या सुमारास झाड कोसळल्याने वैभववाडी-उंबर्डे मार्ग पूर्णपणे बंद झाला होता. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांनी विशेषत: शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयात संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला.परंतु जवळपास १५ ते २० मिनिटे आपत्ती कक्षातील दूरध्वनी खणाणला. मात्र, प्रतिसाद काही मिळाला नाही. हा प्रकार वारंवार अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती काळात मदतीसाठी असलेला तहसीलमधील आपत्ती कक्ष नामधारी ठरला असल्याने जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग