घरावर झाड कोसळले

By Admin | Updated: July 17, 2014 23:09 IST2014-07-17T23:00:29+5:302014-07-17T23:09:16+5:30

५0 हजारांचे नुकसान : आचरा पिरावाडी येथील घटना

The tree collapsed at home | घरावर झाड कोसळले

घरावर झाड कोसळले

आचरा : बुधवारी सकाळपासून सतत कोसळणारा पाऊस व वादळी वाऱ्यामुळे आचरा पिरावाडी येथील प्रतीक्षा प्रवीण सारंग यांच्या घरावर बुधवारी रात्री १२ च्या दरम्यान उंडलीचे झाड कोसळून सुमारे ५० हजारांचे तर त्याच्या शेजारी असलेल्या आनंद तारी यांच्या पडवीवर त्याच झाडाची फांदी पडून दहा हजारांचे नुकसान झाले.
प्रतीक्षा सारंग व त्यांच्या दोन मुली या घरात झोपल्या होत्या. परंतु त्या ठिकाणचे छप्पर सुरक्षित राहिल्याने मोठा अनर्थ टळला. रात्रीच्या सुमारास मोठ्याने झालेला आवाज ऐकून त्यांच्या शेजारी राहणारे शंकर चोपडेकर, दीपक सारंग, हनुमंत तारी, नारायण कुबल यांनी धाव घेत प्रतीक्षा सारंग व त्यांच्या मुलींना बाहेर सुरक्षित घराबाहेर काढले.
दरम्यान, आचरा आणि परिसरात गेले तीन चार दिवस पावसाची संततधार सुरू असून छोटी मोठी
झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार घडत आहेत. (वार्ताहर)

आचरा देऊळवाडी येथील प्रशांत सावंत यांच्या घरासमोरील झाड मध्यरात्री कोसळले. चिंचेचा वृक्ष मोकळ्या जागेत कोसळल्याने मोठा अनर्थ टळला. या भागात दिवसा लोकांची रेलचेल असते. रात्रीच्या सुमारास चिंचेचा वृक्ष पडल्याने मोठी दुर्घटना टळलली.

Web Title: The tree collapsed at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.