शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कारमधून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक, ३४ लाखाचा मुद्देमाल जप्त; चालक पसार

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: December 1, 2023 15:48 IST

सिंधुदुर्ग/वैभववाडी : तालुक्यातील नापणे येथे एका आलिशान कारमधून गोवा बनावटीची दारू वाहतूक करत असताना एक कार राज्य उत्पादन शुल्क ...

सिंधुदुर्ग/वैभववाडी : तालुक्यातील नापणे येथे एका आलिशान कारमधून गोवा बनावटीची दारू वाहतूक करत असताना एक कार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कणकवली पथकाने पकडली. ही घटना शुक्रवारी रात्री १:३० वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये गोवा राज्यनिर्मित विदेशी मद्य रु. ५,५५,१२०/- किंमतीच्या मद्य साठ्यासाह एक चार चाकी वाहन असा सुमारे ३४,५५,१२०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या कार क्रमांक (एम एच ०९ ईके- ६७६९)ला इन्सुली चेकपोस्ट येथे तपासणीसाठी थांबविण्यासाठी इशारा करण्यात आला होता. मात्र चालकाने पथकाला हुलकावणी देत पुढे वेगाने निघून गेला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कणकवली पथकास याची माहिती देवून सदरची कार थांबविण्याची मागणी केली. त्यानुसार कणकवली विभागाने व तपासणी नाका येथील पथकाने संयुक्तपणे कारचा पाठलाग केला.मात्र, कार चालकाने मुंबई गोवा महामार्गावरून खारेपाटण व तेथून परत वैभववाडीच्या दिशेने कार पळवली. पथकाने कारचा पाठलाग सुरूच ठेवला. नापणे रस्त्याला रस्ता अरुंद असल्याने चालकाने आजूबाजूच्या जंगलमय भागाचा व काळोखाचा फायदा घेवून कार तिथेच सोडून पळ काढला. यावेळी पथकाने कारमधून गोवा राज्य बनावटी दारुचा मुद्देमाल जप्त करुन वाहन ताब्यात घेतले.ही कारवाई वैभव व्ही. वैद्य, अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनानुसार निरीक्षक प्रभात सावंत, एस. डी. पाटील दुय्यम निरीक्षक, प्रदिप रास्कर, दुय्यम निरीक्षक, तपासणी नाका – गोपाळ राणे सहाय्यक दुय्यम निरीक्षक, सुरज चौधरी सहाय्यक दुय्यम निरीक्षक, रणजित शिंदे जवान  वाहनचालक, महिला जवान स्नेहल कुवेसकर, यांनी सहभाग घेतला होता. याबाबत पुढील तपास संतोष पाटील, दुय्यम निरीक्षक कणकवली करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस