शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारु वाहतुकीवर कारवाई, कुडाळातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 11:21 IST

राज्य उत्पादन शुल्क कुडाळच्या पथकाने पणदूर तिठा येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून गोवा बनावटीच्या दारूची अवैधरितीने वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोसह सुमारे ३३ लाख ४३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. टेम्पोचालकालाही अटक करण्यात आली असून, ही कारवाई गुरुवारी सायंकाळी करण्यात आली.

ठळक मुद्देअवैध दारु वाहतुकीवर कारवाई, कुडाळातील घटना एकास अटक; वाहनासह ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त

कुडाळ : राज्य उत्पादन शुल्क कुडाळच्या पथकाने पणदूर तिठा येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून गोवा बनावटीच्या दारूची अवैधरितीने वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोसह सुमारे ३३ लाख ४३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. टेम्पोचालकालाही अटक करण्यात आली असून, ही कारवाई गुरुवारी सायंकाळी करण्यात आली.राज्य उत्पादन शुल्क कुडाळ पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गुरुवारी सायंकाळी पणदूर तिठा येथे सापळा रचला होता. सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अशोक लेलँड कंपनीच्या टेम्पोला तपासणीसाठी थांबविण्याचा इशारा केला.

या टेम्पोची तपासणी केली असता मागचा टेम्पो रिकामी होता. मात्र, सखोल तपासणी केली असता टेम्पोच्या केबिनच्या पाठीमागे असलेल्या हौद्यात विशिष्ट प्रकारे तयार केलेल्या जागेत गोवा बनावटीच्या दारुचे एकूण २४० खोके आढळून आले. या टेम्पोसह सर्व दारूसाठा ताब्यात घेण्यात आला. तसेच टेम्पोचालक आप्पा बलभिम माने (३६, रा. पोखरापूर, सोलापूर) याला अटक करण्यात आली.कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपआयुक्त वाय. एम. पवार व जिल्हा अधीक्षक डॉ. बी.एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पथकाचे दुय्यम निरीक्षक ए. आर. जगताप, प्रभारी निरीक्षक एन.पी.रोटे, सी.डी.पवार, जवान वाहन चालक एच.आर.वस्त, जवान प्रसाद माळी, महिला जवान एम.आर.चव्हाण, विजय राऊळ, प्रशांत परब व अवधुत सावंत यांनी केली. या गुन्ह्याचा तपास दुय्यम निरीक्षक ए.आर.जगताप करीत आहेत. 

टॅग्स :liquor banदारूबंदीsindhudurgसिंधुदुर्ग