शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गातील मांगेलीत वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, दोघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 13:23 IST

सहजच दगड मारला. तो मधमाशांच्या पोळ्यावर जाऊन बसला

दोडामार्ग : मांगेली येथे वर्षा पर्यटनाचा मनसोक्त आनंद लुटून सायंकाळी घरी परतणाऱ्या बेळगाव येथील पर्यटकांच्या चमूवर मधमाशांनी हल्ला केला. त्यात दोघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर बेळगाव येथील केएलइ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही दुर्घटना रविवारी सायंकाळी उशिरा मांगेली व कर्नाटक सीमेवरील सडा खिंड येथे घडली. रमेश दोड्डामणी ( २५) व संजय बेळकुंदरीकर ( २६) अशी गंभीर जखमींची नावे असून, इतरही चारजण किरकोळ जखमी झाल्याचे समजते.सध्या दोडामार्ग तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. साहजिकच सह्याद्रीच्या डोंगरांगांधील धबधबे प्रवाहित झाले आहेत. मांगेली फणसवाडीचा धबधबाही पूर्णक्षमतेने कोसळत आहे. त्यामुळे या धबधब्याच्या पांढऱ्या शुभ्र पाण्याखाली न्हाऊन निघण्यासाठी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील गोवा, कर्नाटक राज्यातील पर्यटक तुफान गर्दी करीत आहेत.रविवारी मांगेलीच्या वर्षापर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक मांगेलीत दाखल झाले होते. शेजारील कर्नाटक राज्यातील बेळगाव येथून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या सात तरुणांचा एक ग्रुप मांगेलीत आला होता. दिवसभर मजा मस्ती करून वर्षापर्यटनाचा आस्वाद लुटल्यावर ते सडामार्गे चोरल्याच्या रस्त्याने घरी जाण्यास निघाले. मांगेलीची सीमा जिथे संपते व कर्नाटक सीमा सुरू होते अशा सडा खिंड म्हणून परिचित असलेल्या जागेवर ते थांबले व त्यातील दोघेजण लघुशंकेसाठी गाडीतून खाली उतरले. त्यापैकी एकाने खिंडीवरून खाली सहजच दगड मारला. तो मधमाशांच्या पोळ्यावर जाऊन बसला आणि त्या डिवचल्या गेल्या. परिणामी डिवचलेल्या मधमाशांनी त्या युवकांवर काही कळायच्या आतच हल्ला चढविला. यावेळी त्यांच्या गाडीत प्लास्टिक होते त्या प्लास्टिकच्या आधारे गाडीतील इतर सहकाऱ्यांनी कसेबसे त्यांना गाडीत घालून उपचारासाठी थेट बेळगावच्या केलइ रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून समजते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtourismपर्यटन