शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

आंबोलीतील वर्षा पर्यटनात पर्यटक चिंब; हजारो पर्यटक दाखल, घाटात मोठी वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 19:12 IST

आंबोलीमधील सर्वच ठिकाणी पर्यटकांची गर्दी

आंबोली: सध्या आंबोली चे वर्षा पर्यटन झोकात सुरू असून सध्या आंबोली च्या धबधब्यावर पर्यटक चिंब झाले आहेत पावसाने थोडीशी उघडीप घेतली असली तरी  हजारो पर्यटक सध्या धबधब्याचा आनंद लुटताना दिसत आहेत.

पर्यटक मिळेल त्या वाहनाने मुख्य धबधब्यावर येत असल्याने घाटात वाहतूक कोंडी झाली असून ही कोंडी सोडवताना पोलिसांची चांगलीच दमछाक होतना दिसत आहे.त्यातच मद्यपी पर्यटकांनी मुख्य रस्त्यावर नाचगाणी सुरू केल्याने वाहतुकीला अडथळा होतना दिसत आहे.रविवारी कोल्हापूर बेळगाव गोवा परिसरातील दहा ते पंधरा हजार पर्यटक  वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आंबोली मध्ये दाखल झाले होते.

वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आज आंबोलीमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाड्या पार्क केल्यामुळे आंबोलीतील मुख्य मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे पर्यटक हैराण झाले आहेत. तर कोंडी सोडवताना पोलिसांची दमछाक झाली.विशेषतः मुख्य धबधबा आणि इतर पर्यटन स्थळांच्या परिसरात वाहनांची मोठी गर्दी दिसून येत आहे. पर्यटकांनी रस्त्याच्या दुतर्फा मिळेल त्या जागेत गाड्या पार्क केल्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणेही कठीण झाले आहे. परिणामी पर्यटकांना आपल्या गाड्या अनेक किलोमीटर दूर पार्क करून पायी चालावे लागत आहे. 

स्थानिक प्रशासनाने आणि वाहतूक पोलिसांनी या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पर्यटक आणि स्थानिकां कडून केली जात आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्याची आणि पार्किंगसाठी योग्य व्यवस्था करण्याची गरज आहे, असे मत पर्यटकातून व्यक्त करण्यात आला.आंबोलीमधील सर्वच ठिकाणी पर्यटकांची गर्दीआंबोली तील मुख्य धबधब्यावर पर्यटकांची गर्दी झाली होती पण महादेव गड पाॅईट ही पर्यटकांनी फुल्लून गेला होता.कावळेसाद पॉईंट वर ही पर्यटकांची गर्दी होती त्या शिवाय अनेक पर्यटक आंबोली चौकुळ रस्त्यावर ही दिसून येत होते.

टॅग्स :Amboli hill stationआंबोलि हिल स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग