कुडाळ एमआयडीसीमधील विश्रामगृह पर्यटकांचे आकर्षण ठरणार
By Admin | Updated: August 18, 2014 23:28 IST2014-08-18T22:01:23+5:302014-08-18T23:28:23+5:30
जनतेने अज्ञानी खासदार निवडला

कुडाळ एमआयडीसीमधील विश्रामगृह पर्यटकांचे आकर्षण ठरणार
कुडाळ : वैभवशाली व निसर्गसंपन्न या कुडाळच्या सौंदर्यात एमआयडीसीच्या अत्याधुनिक सेवा सुविधांनी परिपूर्ण असलेले विश्रामगृह निश्चितच भर टाकेल व पर्यटनाच्या या जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांच्या निवासासाठी ही वास्तू निश्चितच आवडेल, असे प्रतिपादन पालकमंत्री नारायण राणे यांनी कुडाळ एमआयडीसीच्या विश्रामगृहाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
कुडाळ एमआयडीसी येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने सुमारे पाच कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक सोयीसुविधा असलेल्या एमआयडीसीच्या विश्रामगृहाचे उद्योगमंंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी काँगे्रसचे युवा नेते नितेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, जिल्हाधिकारी ई. रवींद्रन, महम्मद फारुखी, एमआयडीसी रत्नागिरीचे अधीक्षक राजेंद्र सोनजे, पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर, सरपंच स्रेहलता पडते, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, प्रवीण भोसले, संदेश पारकर आदी उपस्थित होते. मेहनत, क ष्ट करून, व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून उद्योग व्यवसायात उतरा आणि लहानापासून मोठे उद्योग निर्माण करा, असे आवाहन राणे यांनी केले. राज्यात गुजरात तसेच इतर राज्यातील लोक मोठे उद्योजक आहेत. जिल्ह्यातील एक तरी उद्योजक धीरूभार्इंसारखा मोठा व्हावा, अशी इच्छा राणे यांनी उपस्थित उद्योजकांसमोर व्यक्त केली. प्रत्येकाने कामात नाविन्यता आणावी, परिवर्तनाच्या प्रत्येक क्षणाची दखल घेऊन जीवनात यशस्वी भरारी घ्या, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी वास्तूविशारद माधव आंबेकर, ठेकेदार महेंद्र शर्मा तसेच अधिकाऱ्यांचा सत्कार राणेंच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने उद्योजक, एमआयडीसीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे निवेदन नागेश नेमळेकर यांनी केले. (प्रतिनिधी)
जनतेने अज्ञानी खासदार निवडला
ज्या खासदाराला इको-सेन्सिटिव्ह म्हणजे काय ते माहीत नाही, अशा अज्ञानी खासदाराला कोकणी जनतेने निवडून दिले, अशी खंत व्यक्त करून राणेंनी खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका के ली.