शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
4
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
5
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
6
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
8
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
9
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
10
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
11
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
12
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
13
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
14
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
15
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
16
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
17
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
18
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
19
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
20
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती

corona virus-पर्यटक थेट रुग्णालयात, महसूल विभागाकडूनही नोंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 4:24 PM

गोव्यातील देशी-विदेशी पर्यटक मालवणात दाखल होत असल्याने सकाळपासूनच मालवण पोलिसांनी सतर्कता बाळगत गोवा तसेच अन्य भागातून येणाऱ्या गाड्यांमधील पर्यटकांना थेट मालवण ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक आरोग्य तपासणीसाठी पाठविले.

ठळक मुद्देपर्यटक थेट रुग्णालयात, कोरोना व्हायरसचा धसका महसूल विभागाकडूनही पर्यटकांच्या नोंदी

मालवण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने गोव्यातील कॅसिनो, डिस्को क्लब, हॉटेल, जहाजांमधून पर्यटकांसाठी जलसफर बंद केली. त्यामुळे गोव्यातील देशी-विदेशी पर्यटक मालवणात दाखल होत असल्याने सकाळपासूनच मालवण पोलिसांनी सतर्कता बाळगत गोवा तसेच अन्य भागातून येणाऱ्या गाड्यांमधील पर्यटकांना थेट मालवण ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक आरोग्य तपासणीसाठी पाठविले. गोव्यातून मालवणात आलेल्या पर्यटकांमध्ये अनेक पर्यटक विदेशी असल्याचे पोलिसांच्या पाहणीत समोर आले आहे.महाराष्ट्रात वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे. पर्यटनदृष्ट्या महत्त्व असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांचा ओढा असल्याने आरोग्य व पोलीस यंत्रणेकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. शहरातील भरड नाका येथे रविवारी सकाळपासून पर्यटकांच्या वाहनांची तपासणी मोहीम कडक झाल्याने ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. महसूल विभागही तपासणीसाठी आलेल्या पर्यटकांची नोंद ठेवत आहे.पोलिसांनी पर्यटकांचे नाव व पत्ता आदींची नोंदणी करून ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरमार्फत प्राथमिक तपासणीसाठी पाठविले आहे. पर्यटकांना ह्यकोरोनाह्णसदृश लक्षणे असल्यास पुढील तपासणीसाठी ओरोस जिल्हा रुग्णालय येथे पाठविले जाईल. तपासणीत लक्षणे नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना सोडण्यात येणार आहे. ग्रामीण रुग्णालयात संशयित कोरोनाबाधित रुग्णांसाठी विशेष वॉर्ड बनविण्यात आला आहे.पोलिसांकडून खबरदारीकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी विशेष सतर्कता बाळगत पोलीस कर्मचाऱ्यांना राज्याबाहेरील व अन्य भागातून येणाऱ्या पर्यटकांच्या गाड्या थांबवून त्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी तत्काळ ग्रामीण रुग्णालयात पाठविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी कार्यवाही करताना गोव्यातून मालवणात दाखल झालेल्या तीन आराम बसेसमधील पर्यटकांना आरोग्य तपासणी करून घेण्याची सक्ती केली. 

टॅग्स :corona virusकोरोनाtourismपर्यटनsindhudurgसिंधुदुर्ग