सावंतवाडी : निसर्गरम्य नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेल्या आंबोलीचे आता पारपोली फुलपाखरांच्या गावामुळे पर्यटन आणखी बहरून निघणार आहे. हजारो पर्यटक हे फुलपाखरांचे गाव पाहाण्यासाठी येतात आणि वेगवेगळ्या प्रजातीचे फुलपाखरे पाहातात, पण आता या फुलपाखरांच्या गावात फुलपाखरू महोत्सव भरणार असून, नव्याने उभारण्यात आलेल्या ट्री हाउसमुळे पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात राहाता येणार आहे. त्यामुळे फुलपाखरांच्या गावच्या नवीन झळाळी मिळणार आहे.याच अनुषंगाने पारपोली गावात शनिवार, २० डिसेंबर रोजी तिसऱ्या फुलपाखरू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी नावीन्यपूर्ण पारपोली ट्री हाउस आणि महोत्सवाच्या आकर्षक प्रवेशद्वाराचेही उद्घाटन करण्यात येणार आहे. पारपोली संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि महाराष्ट्र वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव होत आहे.पारपोली गावात फुलपाखरांच्या वाढीसाठी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण सूक्ष्म असे वातावरण असून, फुलपाखरांचे अन्न असलेली विविध प्रकारची फुले उपलब्धतेचे वरदान आहेत. त्यामुळे सुमारे १८० प्रकारची विविध फुलपाखरे या गावात आढळतात, फुलपाखरांच्या जैवविविधतेने नटलेले पारपोली गाव फुलपाखरांच्या प्रजातीचे माहेरघर आहे. या गावात अतिशय दुर्मीळ आणि केवळ पश्चिम घाटात आढळणाऱ्या फुलपाखरांच्या असंख्य प्रजाती यातील फुलपाखरांच्या बहुसंख्य जाती या गावात आढळून येतात.या महोत्सवात पारपोली ते आंबोली घाट या भ्रमंतीत जंगल आणि दरी खोऱ्यातील विविध दुर्मीळ वन्यजीवांची माहिती, उंच कड्यावरून कोसळणारे दुधाळ धबधबेही अनुभवता येणार आहे. फुलपाखरू तज्ज्ञ अभ्यासकांच्या मार्गदर्शनाखाली जंगलातील फुलपाखरांच्या माहितीसह त्यांच्या जीवनक्रम आणि त्याबाबतचे ज्ञान व विज्ञान, तसेच तांत्रिक माहिती पर्यटकांना देण्यात येणार आहे.कावळेसाद पॉइंट, हिरण्यकेशी उगमस्थान, फुलपाखरू वनजान याचाही आस्वाद घेता येणार आहे, तसेच या महोत्सवात पारपोली गावातील पारंपरिक घरात राहण्यासह पारंपरिक खाद्य संस्कृतीचा आणि विविध पारंपरिक कला याचा आस्वाद घेण्याची संधीदेखील पर्यटकांना मिळणार आहे.गावाच्या पर्यटनासाठी मिळणार चालना...शाळा-महाविद्यालयांना अभ्यास सहलीकरिता फुलपाखरू पदभ्रमंती करताना विद्यार्थ्यांना फुलपाखरे बघण्याची आणि त्यांच्याबद्दल अधिक माहिती समजून घेण्याबरोबरच पर्यावरण व वन्यजीवांविषयी कुतूहल निर्माण होण्यास मदत होणार आहे. या महोत्सवाच्या आयोजनामुळे गावांतील स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, तसेच गावाच्या पर्यटन विकासासाठी चालना मिळणार आहे.
तिसऱ्या फुलपाखरू महोत्सवाचे आज उद्घाटनफुलपाखरू महोत्सवाचे शनिवारी सकाळी ११ वाजता उद्घाटन होणार असून, पालकमंत्री तथा बंदर विकासमंत्री नीतेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार नीलेश राणे, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, कोल्हापूर मुख्य वनसंरक्षक जी. गुरुप्रसाद आदी उपस्थितीत राहणार आहेत.
Web Summary : Parpoli, Sindhudurg, enhances tourism with a butterfly festival and new tree house. The village, home to 180 butterfly species, hosts its third festival, promoting ecotourism and local culture. Visitors can explore diverse flora, fauna, and traditional experiences.
Web Summary : सिंधुदुर्ग के पारपोली में तितली महोत्सव और नए ट्री हाउस से पर्यटन बढ़ा। 180 तितली प्रजातियों का घर, यह गाँव तीसरा महोत्सव आयोजित करता है, जो पारिस्थितिक पर्यटन और स्थानीय संस्कृति को बढ़ावा देता है। आगंतुक विविध वनस्पतियों, जीवों और पारंपरिक अनुभवों का पता लगा सकते हैं।