शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत ५ जानेवारीपासून पर्यटन महोत्सव!, रसिकांसाठी विविध कार्यक्रमांची महापर्वणी

By सुधीर राणे | Updated: November 25, 2022 15:58 IST

गेले दोन वर्षे कोरोनामुळे हा महोत्सव होऊ शकला नव्हता.

कणकवली: कणकवलीकरांसाठी ५ ते ८ जानेवारी रोजी चार दिवस 'कणकवली पर्यटन महोत्सवाचे' आयोजन करण्यात आले आहे. गेले दोन वर्षे कोरोनामुळे हा महोत्सव होऊ शकला नव्हता. रसिकांसाठी महोत्सवात विविध कार्यक्रमांची महापर्वणीच असणार असल्याची माहिती कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. हा महोत्सव आमदार नितेश राणे व मित्र मंडळींच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.कणकवली नगराध्यक्ष दालनात आज, शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, अण्णा कोदे, विराज भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.नलावडे म्हणाले, पर्यटन महोत्सवाचा शुभारंभ ५ जानेवारीला सायंकाळी भव्य शोभायात्रेने होईल. महोत्सवात लहान व मोठ्या मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, विविध चित्ररथांसह भव्य शोभायात्रा, फुड फेस्टीवल, १५ वर्षाखालील मुलांचा फॅशन शो, 'आम्ही कणकवलीकर' यांच्यावतीने २०० स्थानिक नामवंत कलाकारांचा संगीत, नृत्य व कॉमेडी कार्यक्रम, मराठी कलाकारांचा 'कॉमेडी एक्सप्रेस' कार्यक्रम असे चार दिवस भरगच्च कार्यक्रम असणार आहेत.पर्यटन महोत्सवाचा उद्घाटन समारंभ पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत होणार आहे. ८ जानेवारीला या महोत्सवाचा समारोप समारंभ केंद्रीय मंत्री नारायण राणे, आजी विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे. त्यानंतर हिंदी कलाकारांचा व सेलिब्रेटींच्या उपस्थितीत लाईव्ह ऑर्केस्ट्रा होणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली