शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास सर्वोच्च प्राधान्य : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 16:23 IST

hospital, medicalcollege, udaysamant, sindhudurg सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी या कामास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी येथे दिले.

ठळक मुद्देशासकीय वैद्यकीय महाविद्यालयास सर्वोच्च प्राधान्य : उदय सामंत पालकमंत्र्यांकडून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील जागेची पाहणी

सिंधुदुर्ग : जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी या कामास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी येथे दिले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आय.टी.आय) हॉलची पाहणी शनिवारी पालकमंत्री उदय सामंत यांनी केली. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय शेवाळे, उपअभियंता जोशी आदी उपस्थित होते.

खासदार विनायक राऊत यांनी यावेळी शासकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी शायकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्यासाठी शासनस्तरावर सर्व प्रक्रिया तातडीने पूर्ण कराव्यात अशा सूचना दिल्या.जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणाऱी जागा हस्तांतरण करण्यासाठी शासनस्तरावर सुरू असलेल्या प्रक्रियेची माहिती यावेळी सादर केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मोरे यांनी महाविद्यालय सुरू करण्यासाठी कोणकोणत्या बाबींची आवश्यकता आहे याची माहिती सादर केली. वैद्यकीय महाविद्यालयाच्या हालचालींनी वेग घेतला आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल सादर करावापालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले, शासकीय महाविद्यालयासाठी लागणारी जागा महसूल विभागाने सर्व प्रक्रिया पूर्ण करून तातडीने वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाताकडे वर्ग करावी. त्याबरोबर अधिष्ठाता डॉ. मोरे यांनी शासकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे पाठविण्याची कार्यवाही तातडीने करावी.

प्रस्तावासाठी डॉ. मोरे यांना लागणाऱ्या सर्व बाबींची संबंधित यंत्रणांनी पूर्तता करावी. अधिष्ठाता डॉ. मोरे यांच्या सूचनानुसार आय.टी.आय. मधील लागणारे हॉल वर्ग करून देण्यात यावेत. तसेच महाविद्यायासाठी लागणाऱ्या विविध विभागांसाठी इमारतीची जिल्हाधिकारी व सर्व संबंधित विभागांनी पाहणी करून तसा अहवाल तातडीने सादर करावा.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीयsindhudurgसिंधुदुर्ग