शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खावटी कर्जमाफीचा लाभ मिळावा, सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांनी छेडले धरणे आंदोलन, मागण्या मान्य न झाल्यास..

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 7, 2024 15:23 IST

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खावटी कर्जमाफीचा लाभ मिळावा, सन २०१७ च्या यादीतील शेतकऱ्यांना सन्मान योजनेचा लाभ मिळावा, थ्रिप्स ...

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खावटी कर्जमाफीचा लाभ मिळावा, सन २०१७ च्या यादीतील शेतकऱ्यांना सन्मान योजनेचा लाभ मिळावा, थ्रिप्स रोगामुळे व कोळे रोगामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी (७ मार्च) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन केले. तर मागण्या मान्य न झाल्यास आगामी निवडणुकांमध्ये ‘नोटा’ हे बटन दाबून मतदानाचा हक्क बजावणार असल्याचा इशारा दिला.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू पीक घेणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी मिळाली नाही. शासनाकडून केवळ कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. निवडणुका आल्या की कर्जमाफीची घोषणा करून गेली १० वर्षे शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आता शासनाच्या घोषणांवर विश्वास राहिलेला नाही. कायम फसवणूकच होणार असेल तर जिल्ह्यातील शेतकरी आता कोणीही योग्य नसल्याचा दाखला देण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत ‘नोटा’ बटन दाबून आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.तसा निर्णय झाला असून, यासाठी निवडणूक कालावधीत सर्व शेतकरी आपल्या गावात प्रयत्न करणार आहेत. याची दखल शासनाने घ्यावी व शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीची तत्काळ कार्यवाही करावी. याकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुन्हा जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन लाक्षणिक धरणे आंदोलन केले.यावेळी जिल्हा शेतकरी संघटक श्यामसुंदर राय, प्रकाश वारंग, आग्नेल फर्नांडिस, अर्जुन नाईक, रामकृष्ण चिचकर, सुरेश गावकर, महेश चव्हाण, सुधीर परब, लाडू परब, कृष्णा तुळसकर, अमोल सावंत, संतोष पेडणेकर, संदीप देसाई आदी शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFarmerशेतकरीagitationआंदोलन