यंदाही आमदार विरोधी पक्षाचाच

By Admin | Updated: November 16, 2014 23:53 IST2014-11-16T21:14:30+5:302014-11-16T23:53:45+5:30

राजापूर मतदारसंघ : राजकीय स्थिती कायम

This time, the opposition party is the only party | यंदाही आमदार विरोधी पक्षाचाच

यंदाही आमदार विरोधी पक्षाचाच

राजापूर : राज्याच्या सत्तेत भाजप समवेत न जाता विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्याने राजापूरचा आमदार सत्ताधारी पक्षाचा नाही, हे मागील काही वर्षे चालत आलेले समीकरण पुढे सरकले आहे. त्यामुळे त्याच्या इथल्या विकास कामांवर कितपत परिणाम होईल, अशा शंकांना सुरवात झाली आहे.
सर्वसाधारणपणे राजापूरचा आमदार हा सत्ताविरोधी असतो. हे समीकरण मागील अनेक वर्षांपासून चालत आले आहे. किरकोळ अपवादातच राजापूरचा आमदार हा सत्ताधारी गटाचा होता. अन्यथा राजापूरच्या मतदारांनी बऱ्याचवेळा आपला कौल सत्तेच्या विरोधात दिला होता.
यावेळी तशी संधी चालून आली होती. केंद्रात भाजपाप्रणित एनडीएचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर शिवसेनादेखील केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झाली. त्यावेळी राज्यात महायुतीला तब्बल ४२ लोकसभेच्या जागा मिळाल्याने तत्कालीन कार्यरत असलेल्या आघाडी सरकारची गच्छंती अटळ होती, मात्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीत जागावाटप व मुख्यमंत्री पदावरुन युती विस्कटली व सेना भाजपा स्वतंत्र लढले. त्यानंतर भाजपा हा सर्वाधिक १२२ जागा मिळवून पहिला पक्ष ठरला. त्या पाठोपाठ सत्तेने ६५ जागा मिळवित दुसरा पक्ष ठरला होता.
हिंदुत्व या मुद्यावरुन मागील २५ वर्षे युती करत लढणारे हे दोन्ही पक्षजरी स्वतंत्र लढले असले तरी निकालानंतर सत्तेसाठी एकत्र येतील, अशी सर्वांना आशा होती, तथापी सत्तेतील वाटा किती प्रमाणात मिळावा, या मुद्द््यावरुन बिनसल्याने शिवसेनेने विरोधात बसण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सत्तेत शिवसेना दिसणार नाही, परिणामी राजापूरमधून सेनेचे निवडून गेलेले आमदार राजन साळवी यावेळीही विरोधी बाकाचेच आमदार असतील, असे निदान आजचे जरी चित्र आहे. त्यामुळे त्याचा परिणाम पुढील पाच वर्षे राजापूरच्या विकासावर कितपत होईल, याबाबतच्या शंका आता उपस्थित केल्या जात आहेत.
राजापूर मतदार संघातील आमदार सत्तेतील नसल्याने विकासावर कमालीचा परिणाम झाला आहे. मागील पाच वर्षांत इथले रखडलेले धरण प्रकल्पांना समाधानकारक निधी नसल्याने त्यांची कामे अपूर्णावस्थेत आहेत. शहराला भेडसावणारे नदी पात्रातील गाळ उपशाचे काम अर्धवट आहे. रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी मंजूर झालेली लघु औद्योगिक वसाहत कागदावरच आहे. आरोग्य यंत्रणा तर व्हेंटीलेटरवर आहे. शिक्षणाचे तीनतेरा वाजलेत. मतदारसंघातील रस्त्यांची अवस्था फारच नाजूक आहे. पर्यटनाला उपयुक्त अशी नैसर्गिक साधनसंपत्ती असूनही पर्यटनाला इथे फारशी संधी लाभलेली नाही, अशा अनेक समस्या आजही कायम आहेत. सत्तेत समावेश नसल्यानेच विकासाची गंगा इथे समाधानकारकपणे वाहत नाही, हेच विदारक दर्शविणारे चित्र राहिल्याने आगामी पाच वर्षांच्या कालखंडात यामध्ये फरक जाणवेल, अशी आशा होती. सेनेने सत्तेत न जाता विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतल्याने राजापूरच्या नशिबी परवड येण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)

विरोधी पक्षाचे बाक....
गेल्या कित्येक वर्षात राजापूरला सत्तेपासून दूर रहावे लागल्याचे अनेकवेळा घडले आहे. यंदाची निवडणूक व त्यानंतरचा निकाल लागल्यानंतर शिवसेना सत्तेत सहभागी न झाल्याने आमदार राजन साळवी यांना विरोधी बाकावरच बसावे लागणार आहे. यापूर्वी दोन निवडणुका काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीने लढविली व राज्यात आघाडीची सत्ता आली. आता त्यांना सत्तेपासून दूर रहावे लागले. मात्र राज्यात भाजप व शिवसेना युती होईल असे वाटत असतानाच त्या दोघांमध्येही काडीमोड झाला व त्यातून पुन्हा साळवी यांना मंत्रीपदाची लॉटरी लागेल असे वाटत असतानाच पुन्हा युतीत काडीमोड झाल्याने राजापुूरच्या नशिबी पुन्हा विरोधी बाकच आले आहे.

Web Title: This time, the opposition party is the only party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.