शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

आंबा चोरीच्या रागातून तिघांना नग्न करून बेदम मारहाण; व्हिडिओही काढला, सिंधुदुर्गातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 12:57 IST

उभादांडा-वरचेमाडवाडी येथे ९ मे रोजी रात्रौ आंबा चोरी केल्याच्या संशयावरून ही मारहाणी केली.

वेंगुर्ला: आंबा चोरीच्या रागातून वेंगुर्लेतील तिघांना नग्न करून बेदम मारहाण केल्याचा कीळसवाणा प्रकार तालुक्यात घडला आहे. तसेच हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत. ही घटना उभादांडा-वरचेमाडवाडी येथे नुकतीच घडली. 

दरम्यानयाबाबत मारहाण झालेल्या गौतम वेंगुर्लेकर याने दिलेल्या तक्रारी नुसार प्रसाद मांजरेकर, प्रतिक धावडे, रावशा शेलार, गौरव मराठे, दिनेश गवळी, योगी सरमळकर याच्यासह दहा ते बारा जणांवर जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करणे तसेच अश्लील चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संशयित वेंगुर्ले येथून फरार झाले आहेत. मात्र आंबा चोरी प्रकरण हे निमित्त असून हा प्रकार अवैद्य दारू आणि गांजा विक्री प्रकरणातूनच घडला असल्याची जोरदार चर्चा वेंगुर्ले मध्ये सुरू आहे.

उभादांडा-वरचेमाडवाडी येथे ९ मे रोजी रात्रौ आंबा चोरी केल्याच्या संशयावरून ही मारहाणी केली, आणि नग्नावस्थे मधील मारहाणीचा व्हिडीओ करून तो व्हायरल केला. तो जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्यापर्यत गेल्याने या प्रकरणी वेंगुर्ले पोलीसांना चौकशी करून कारवाईच्या सुचना १० मे रोजी देण्यात आल्या होत्या. 

जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या सुचनेनुसार वेंगुर्ले पोलीसांनी गौतम वेंगुर्लेकर याची तक्रार १२ मे रोजी घेतली. या तक्रारीत त्यांनी कोणतेही कारण नसताना आपणास नग्न करून मारहाण करीत मारहाणीचा व्हीडीओ काढला, सदरचा मारहाणीचा व्हीडीओ व्हायरल केला बरोबरच जातीवाचक बोलून अपमान केल्याचे नमुद आहे. या तक्रारी वरून वेंगुर्ले पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास विभागीय पोलीस अधिकारी श्रीमती रोहिणी साळुंखे करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिसMangoआंबा